त्रेपन्न वर्षांनी जमला नूतनच्या वर्गमित्रांचा मेळा

त्रेपन्न वर्षांनी जमला नूतनच्या वर्गमित्रांचा मेळा

सेलूत नूतन विद्यालयाच्या १९७२ च्या बॅचचा स्नेहमेळावा उत्साहात, शाळेच्या स्वागताने भारावले सारे

त्रेपन्न वर्षांनी जमला नूतनच्या वर्गमित्रांचा मेळा

नूतन विद्यालय संस्काराचे विद्यापीठ : श्याम मणियार

सेलूचे नूतन विद्यालय हे संस्काराचे विद्यापीठ असून आम्ही त्या शाळेचा अंश असल्याचा आम्हाला अभिमान आहे. समर्पण, त्याग, निष्ठा, देशभक्तीचे संस्कार प्रशालेने आमच्यावरती केल्यामुळेच आम्ही आज आमच्या जीवनात स्वाभिमानाने उभे आहोत. अशी भावना माझी विद्यार्थी श्याम मणियार यांनी व्यक्त केली.

सेलू जि.परभणी :  सेलू येथील नूतन विद्यालयाच्या इयत्ता दहावीच्या १९७२ च्या बॅचचा स्नेहमेळावा शनिवारी आणि रविवारी (१३ आणि १४ सप्टेंबर) श्री बालाजी मंदिरच्या सिंदूर सभागृहात उत्साहार पार पडला. आज वयाची सत्तरी ओलांडलेल्या ५९ वर्गमित्र-मैत्रिणांचा हा मेळा तब्बल अर्ध्या शतकानंतर (५३ वर्ष) जमला होता. यामध्ये ३३ जणांनी सपत्नीक सहभाग घेतला.
शनिवारी दिवंगत मुख्याध्यापक आणि सेलूभूषण शंकरराव मंडलिक गुरुजी यांच्या प्रतिमेला अभिवादन करून आणि दीपप्रज्वलनाने मेळाव्याचे उद्घाटन झाले. संयोजन समितीप्रमुख माजी नगराध्यक्ष तथा साईबाबा नागरी सहकारी बँकचे अध्यक्ष हेमंतराव आडळकर, आरबी घोडके इन्फ्रास्ट्रकचरचे संचालक उद्योजक रामप्रसाद घोडके, ज्ञानेश्वर सोळंके, श्याम मणियार, मुजीब घोरी, डॉ.सुभाष परतानी, रमा सोमैय्या, माणिक रोडगे, डॉ. ईश्र्वरचंद्र हुरकट यांची प्रमुख उपस्थिती होती. दुसऱ्या सत्रात मनोगतातून दहावीनंतर प्रवास मांडतांना शाळेचे संस्कार, गुरूजनांविषयीचा आदर, शाळेविषयी अभिमान विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आणि मैत्रीच्या मौल्यवान नात्याचे महत्त्व अधोरेखित केले. स्वागतपर मनोगत श्री.आडळकर, तर प्रास्ताविक प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.भगवान टेकाळे यांनी केले. पुष्पा झंवर यांनी आभार यांनी मानले. कार्यक्रमस्थळी दिवंगत गुरूजन तसेच वर्गमित्रांचे छायाचित्र प्रदर्शित करून अभिवादन केले.सायंकाळी बाहेती बिहाणी नूतन इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी योग प्रात्यक्षिके सादर करून मने जिंकली. रात्री संगीत शिक्षक सच्चिदानंद डाखोरे, पूजा तोडकर, दीपक देवा, मनीषा पांडे आणि स्वाती तांबे यांच्यासह गौतम सूर्यवंशी आणि माजी विद्यार्थ्यांच्या सहभागाने सादर झालेला गीत संगीताचा बहारदार कार्यक्रम उशीरापर्यंत रंगला. रविवारी दुपारी समारोप झाला. या वेळी गुरूजनांचा तसेच माजी विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. मेळाव्याच्या यशस्वितेसाठी माजी नगराध्यक्ष हेमंतराव आडळकर, प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, प्रा.भगवान टेकाळे, रामप्रसाद घोडके, श्यामसुंदर मणियार, डॅा.सुभाष परताणी, श्रीकांत दिक्षित, सतिश टाक, मुजीब घोरी, नंदकिशोर राजूरकर, मधुकर तावरे, पांडुरंगराव मगर, प्रकाश धामणगावकर , शरयू मुळावेकर, मधुकर कव्हळे, विठ्ठल गायकवाड, सतीश पांडे, माणिक रोडगे, गौतम सूर्यवंशी, ज्ञानेश्वर शिंदे, रामकिशन शेरे, प्रकाश भरड, प्रा.प्रकाश कुरूंदकर, रामराव लाडाणे, साईबाबा बॅंकचे अधिकारी व कर्मचारी तसेच सर्व माजी विद्यार्थी आणि संयोजन समितीने पुढाकार घेतला.

स्वागताने भारावले माजी विद्यार्थी

रविवारी, १४ सप्टेंबर रोजी सकाळी माजी विद्यार्थ्यांनी प्रभातफेरी काढली. प्रार्थना, राष्ट्रगीत, राज्यगीत, प्रतिज्ञा म्हणत शालेय आठवणी जागविल्या. शाळेच्या वतीने प्रवेशव्दारावरच पुष्पवृष्टीकरून वाजत गाजत तसेच शालेय दैनंदिनी, स्मृतिगंध सन्मानपत्र, गुलाब पुष्प आणि औक्षणाने केलेल्या स्वागताने माजी विद्यार्थी भारावून गेले. कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया, उपाध्यक्ष डी.के.देशपांडे, सचिव प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर, सहसचिव जयप्रकाश बिहाणी, नंदकिशोर बाहेती, दत्तराव पावडे, अजिजखाँ पठाण, राजेश गुप्ता, पी.एम.रोडगे, प्रकाश पांडव, हेमंतराव आडळकर, उद्योजक रामप्रसाद घोडके, मुख्याध्यापक संतोष पाटील, निशा पाटील, उल्हास पांडे यांची उपस्थिती होती. सेलूचे नूतन विद्यालय हे संस्काराचे विद्यापीठ असल्याची भावना श्याम मणियार आणि डॉ.सुभाष परताणी यांनी व्यक्त केली. सूत्रसंचालन डॉ.सुरेश हिवाळे यांनी केले. तर डॉ.काशिनाथ पल्लेवाड यांनी आभार मानले.

त्रेपन्न वर्षांनी जमला नूतनच्या वर्गमित्रांचा मेळा

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!