तणावमुक्तीसाठी ‘मंडला आर्ट’ : ऋतुजा तापडिया; सेलूतील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात कार्यशाळा उत्साहात

तणावमुक्तीसाठी ‘मंडला आर्ट’ : ऋतुजा तापडिया; सेलूतील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात कार्यशाळा उत्साहात

सेलू जि.परभणी : ‘मंडला आर्ट थेरपी’ या कलेच्या साहाय्याने विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य सुधारावे, तणाव आणि चिंता दूर व्हावे आणि अभ्यासातील एकाग्रता वाढावी आणि कलेची जोपासना व्हावी यासाठी परभणी येथील होमिओपॅथीक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज या संस्थेच्यावतीने बालकांचा कला विकास व्हावा या उद्देशाने २६ मार्च रोजी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शक ऋतुजा तापडिया, केंद्रप्रमुख एकनाथ जाधव, निवृत्त ग्रंथपाल शिवाजी शिंदे, मुख्याध्यापक वेडे मॅडम, गृहप्रमुख प्रेरणा पवार, मासिक पाळी समुपदेशक डॉ.आशा चांडक, सेजल तापडिया, कलाशिक्षक पांडुरंग पाटणकर उपस्थित होते. कार्यशाळेत ऋतुजा तापडिया यांनी मंडला आर्टचा दैनंदिन जीवनात मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी, दीर्घकाळ तणावमुक्त राहण्यासाठी कसा उपयोग होतो याविषयी माहिती दिली.
तापडिया म्हणाल्या “मंडल हा शब्द संस्कृतमधून आला आहे, ज्याचा अर्थ वर्तुळ आहे. ही एक रचना किंवा नमुना आहे. ज्याचा इतिहास बौद्ध आणि हिंदू धर्माच्या अध्यात्माशी संबंधित आहे. मंडलाची रचना प्रत्यक्षात विश्वाचे प्रतिनिधित्व करते आणि विश्वातील समतोल चिन्हांकित करते. ज्याप्रमाणे ब्रह्मांड सर्व गोष्टी स्वतःमध्ये सामावून घेते, त्याचप्रमाणे मंडलातील रेषा केंद्रस्थानी एकत्र आलेल्या दिसतात. मंडला आर्ट तणाव आणि चिंता दूर करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. जेव्हा तुम्ही मंडला आर्ट बनवत असाल, तेव्हा त्यातील बारकावे पाहून संपूर्ण लक्ष त्या कलेवर केंद्रित राहते आणि यामुळे कोर्टिसोल हार्मोनची पातळी कमी होते, ज्यामुळे तणाव कमी राहतो.”
कृतीपूर्ण सत्रातून विविध प्रात्यक्षिके दाखवून उपस्थित विद्यार्थिनींकडून मंडला आर्ट्स साकारले. या सत्रानंतर बालकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. आनंदी होऊन शाळेतील शंभर मुलांनी कृतीशील सहभाग नोंदविला. सूत्रसंचालन पांडुरंग पाटणकर यांनी केले. आभार अश्विनी बोराडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी एचएआरसी संस्थेचे डॉ.पवन चांडक आणि प्राध्यापक शिवा आयथॉल सुमित्रा पवार, अश्विनी बोराडे, योजना कातकडे, बेबी केंद्रे, अनुसया शिंदे, आम्रपाली कांबळे,शीतल अवचार, सुजाता सेलुकर, रावसाहेब पदमपल्ले, सुहास नवले यांनी सहकार्य केले. एचएआरसी संस्थेचे डॉ.पवन चांडक आणि प्राध्यापक शिवा आयथॉल यांचे सहकार्य लाभले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!