निरामय जीवनासाठी योग त्रिसुत्रीचा अवलंब करा : स्वामी परमार्थ देव

निरामय जीवनासाठी योग त्रिसुत्रीचा अवलंब करा : स्वामी परमार्थ देव

सेलू : सेलू तालुका पंतजली योग परिवारच्या वतीने मुख्य केंद्रीय प्रभारी परमपूज्य स्वामी परमार्थ देव यांचे शुक्रवारी ,२९ मार्च रोजी साई नाट्यमंदिरात व्याख्यान झाले. या वेळी स्वामीजींनी योग, आयुर्वेद, भारतीय संस्कृती यावर सविस्तर मार्गदर्शन केले. निरामय जीवनासाठी योग त्रिसुत्रीचा अवलंब करावा, असे मत स्वामीजींनी यावेळी व्यक्त केले. अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. विनायकराव कोठेकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून राज्य प्रभारी बापूजी पाडळकर, माजी नगराध्यक्ष विनोदराव बोराडे, लक्ष्मीकांत पाथरीकर महाराज, उदय वाणी, अविनाश आचार्य , धोंडीराम सेप, नीता बलदव, पूनम खत्री, बालासाहेब गजमल, चंद्रप्रकाश सांगतानी, उर्मिला बोराडे आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.
याप्रसंगी जिल्ह्यातील पतंजली योग परिवाराच्या माध्यमातून उत्कृष्ट कार्य केलेल्या कार्यकर्त्यांचे मुख्य केंद्रीय प्रभारी परमार्थ देवजी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये सेंद्रिय शेती तज्ञ पुरस्कारप्राप्त सोमेश्वर गिराम आणि राधिका गिराम, सेंद्रिय संत्रा उत्पादक विष्णू निर्वळ (रूढी ता.मानवत), पंडित थोरात ( खानापूर) , गोशाळेचे मुख्य व्यवस्थापक राधाकिशन कदम ( ब्रह्मवाकडी),  कृषी पत्रकारिता पुरस्कार प्राप्त राम सोनवणे यांचा सत्कार करण्यात आला. नूतन योग सेंटरच्या संस्कृती डहाळे आणि श्रुती खंदारे या राष्ट्रीय योगपटूंनी उत्कृष्ट योगासन प्रात्यक्षिक सादर केले. प्रास्ताविक नागेश देशपांडे यांनी केले. सूत्रसंचालन देविदास सोन्नेकर यांनी केले. कैलास रकटे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी दत्तात्रय माकोडे, डॉ.श्रीराम गजमल, अशोक वैद्य, विनोद मोगल, ज्ञानोबा बरसाले, परमेश्वर राऊत, विजयकुमार राऊत, मधुरा खारकर, विना मालाणी, रोहित खत्री यांनी परिश्रम घेतले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!