गुढी पाडवा : सेलूतील ‘सुंदर माझी गुढी’स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

गुढी पाडवा : सेलूतील ‘सुंदर माझी गुढी’स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

सेलू जि.परभणी : गुढीपाडव्यानिमित्त सेलू येथील श्री साईबाबा मंदिरात मंगळवारी, ९ एप्रिल रोजी महिलांसाठी ‘सुंदर माझी गुढी’ स्पर्धा आयोजिण्यात आली होती. स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेमध्ये विविध सजावटीद्वारे महिलांनी सामाजिक विषयांसह लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्राधान्याने मतदानाचा जागर घातल्याचे दिसून आले. गुढीपाडवा व श्रीरामनवमी निमित्ताने श्री साईबाबा मंदिर संस्थानच्या वतीने १० ते १७ एप्रिलपर्यंत श्रीसाई महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये नंदकिशोर महाराज गोंदीकर यांची श्रीमद् भागवत कथा, कीर्तन आदी कार्यक्रम होत आहेत. महोत्सवांतर्गत मंगळवारी साईबाबा सभामंडपात सकाळी दहा वाजता ‘सुंदर माझी गुढी’ स्पर्धेला सुरुवात झाली. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, मुकेशराव बोराडे, राजू पटेल, साईराज बोराडे, अजित मंडलिक, प्रदीप बाहेती, रवि मुळावेकर, रवि कुलकर्णी, गंगाधर कान्हेकर, शंकर राऊत, भारत काठवटे आदींची उपस्थिती होती. स्पर्धेमध्ये महिला व युवतींनी कल्पकतेने गुढ्या उभारल्या. आकर्षक रांगोळी व सजावट लक्षवेधी ठरली. याद्वारे वृक्षारोपण, पाण्याचा काटकसरीने वापर करा, विजेची बचत ईव्हीएम मशीन आदींसह ‘तुमचे मत, तुमचा अधिकार’ रांगोळी साकारून मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन मतदारांना करण्यात आले होते. स्पर्धेमध्ये १२३ महिलांनी सहभाग घेतला. उपस्थितांना मसाला दुधाचा प्रसाद देण्यात आला. दरम्यान, स्पर्धेतील विजेत्यांना भागवत कथेदरम्यान प्रोत्साहनपर पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे. साईराज बोराडे तसेच विनोद बोराडे मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्पर्धा संयोजन केले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!