श्रीरामनवमी : श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या मिरवणुकीत उत्साह 

श्रीरामनवमी : श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या मिरवणुकीत उत्साह 

प्रतिनिधी, सेलू : श्रीराम नवमी निमित्ताने सेलू शहरात शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून श्रीराम मूर्तीची मिरवणुकीत उत्साहात पार पडली. मठगल्ली, दत्तनगर, सारंगगल्ली बालाजी मंदिर, लोकमान्य टिळक पुतळा मार्गाने मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीमध्ये मुख्य आकर्षण ठरले ते दिल्ली येथील विशाल अघोरी यांचे अघोरी पथक अघोरी पथकाला पाहण्यासाठी सेलूतील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. रंगीबेरंगी फटाक्यांची आतिषबाजी, श्रीराम व शिवछत्रपतींची भव्यमूर्ती, श्री श्रीरामायणाचा जिवंत देखावा सादरीकरण करण्यात आला. जय श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने परिसर दणाणून गेला. सामुदायिक आरतीने समारोप झाला. हजारोंच्या संख्येने महिला भगिनी सहभागी झाल्या होत्या. शिवभक्तांनी स्वयंशिस्तीचे प्रदर्शन घडवून आणले. शोभायात्रेसाठी श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

 

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!