बाबासाहेब गायकवाड यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी : सेलूतील सकल मराठा समाज बांधवांचे निवेदन
सेलू : मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या सेलू (जि.परभणी) तालुक्यातील देऊळगाव गात येथील बाबासाहेब गीताराम गायकवाड यांच्या कुटुंबीयांना सरकारकडून आर्थिक मदत देण्याची मागणी सेलू येथील सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने करण्यात आली आहे.
या मागणीचे निवेदन तहसीलदार दिनेश झांपले यांना देण्यात आले आहे. बाबासाहेब गीताराम गायकवाड (रा.देऊळगाव गात) यांनी दिनांक १६ एप्रिल रोजी मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही या विवंचनेतून गळफास घेऊन आपले जीवन संपवले होते. त्यांच्या पश्चात पत्नी व मुलगी असा परिवार आहे. कुटुंबाची घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना २५ लाख रुपये आर्थिक मदत तात्काळ देण्यात यावी. तसेच कुटुंबातील एकाला सरकारी सेवेत घेण्यात यावे. असे निवेदनात म्हटले आहे. या वेळी जयसिंग शेळके, राजाराम लिपणे, प्रल्हाद शेळके, लक्ष्मण शेळके, दत्ता मगर, बळीराम मगर, शाम खिस्ते व मराठा बांधव उपस्थित होते.