मुख्याध्यापिका उज्ज्वला लड्डा यांचा सेवागौरव; नूतन विद्यालयात कार्यक्रम
सेलू : मुख्याध्यापिका उज्ज्वला लड्डा यांनी वक्तशीरपणा जपला. त्यांचे कार्य शाळेच्या, संस्थेच्या शैक्षणिक कार्यात मौलिक भर टाकणारे होते. त्यांचा आदर्श इतरांनीही घ्यावा, अशा शब्दांत नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ.व्ही.के कोठेकर यांनी उज्ज्वला लड्डा यांचा सेवा कार्याचा गौरव केला.
श्रीमती लक्ष्मीबाई लालजी रामजी नूतन कन्या प्रशाला व श्रीमती तेजीबाई कन्हैयालाल अग्रवाल उच्च माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका तथा प्राचार्या उज्ज्वला लड्डा यांच्या सेवानिवृत्ती निमित्त शनिवारी, २९ जून रोजी सेवा गौरव करण्यात आला. त्यावेळी प्राचार्य डॉ.व्ही.के.कोठेकर बोलत होते. अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम. लोया होते. याप्रसंगी सहसचिव जयप्रकाशजी बिहाणी, शालेय समितीचे अध्यक्ष नंदकिशोरजी बाहेती, सत्कारमूर्ती उज्वला लड्डा, सतीश भाला, मुख्याध्यापक संतोष पाटील, उपमुख्याध्यापक दत्तराव घोगरे यांची प्रमुख उपस्थिती होती .
सच्चिदानंद डाखोरे यांच्या स्वागत गीताने सुरुवात झाली. याप्रसंगी आरती कदम यांनी उज्ज्वला लड्डा यांच्या विषयी लिहिलेल्या आणि फुलसिंग गावित यांनी ग्राफिक्स केलेल्या लेखाचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. संतोष पाटील, यशवंत कुलकर्णी, रेणुका आंबेकर, शिल्पा बर्डे, स्नेहल कासट यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. नंदकिशोरजी बाहेती यांनी उज्वला लड्डा यांच्या वक्तशीरपणा बद्दल कौतुक केले. उज्ज्वला लड्डा यांचा नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या वतीने शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन संस्था अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया यांनी सत्कार केला. तसेच नूतन कन्या प्रशाला, नूतन विद्यालय, नूतन प्राथमिक शाळा, बाहेती बिहाणी नूतन इंग्लिश स्कूल, महिला मंडळ, माहेश्वरी महिला मंडळ यांच्यावतीने लड्डा यांचा सन्मान करण्यात आला.यादी वाचन संतोष मलसटवाड यांनी केले. मी नेहमीच नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या ऋणात राहू इच्छिते, अशा भावना शब्दात उज्वला लड्डा यांनी मनोगतात व्यक्त केल्या. लड्डा यांनी यापुढेही शैक्षणिक आणि सामाजिक कार्यात सक्रिय सहभागी व्हावे, असे मत अध्यक्षीय भाषणात डॉ.लोया यांनी व्यक्त केले. सूत्रसंचालन शशिकांत देशपांडे यांनी केले. भालचंद्र गांजापुरकर यांनी आभार मानले.
मी नेहमीच नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या ऋणात राहू इच्छिते, अशा भावना शब्दात उज्वला लड्डा यांनी मनोगतात व्यक्त केल्या. लड्डा यांनी यापुढेही शैक्षणिक आणि सामाजिक कार्यात सक्रिय सहभागी व्हावे, असे मत अध्यक्षीय भाषणात डॉ.लोया यांनी व्यक्त केले.