महाविहार आम्रवन : शांती, समृद्धीचा संदेश देणारे पवित्र केंद्र : आमदार मेघना बोर्डीकर

महाविहार आम्रवन : शांती, समृद्धीचा संदेश देणारे पवित्र केंद्र : आमदार मेघना बोर्डीकर

देवगावफाटा : महाआम्रवन परिसरात भगवान बुद्धांच्या मूर्तीचा पायाभरणी सोहळा थाटात, धम्मदेसना व भीमगीतांच्या कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद

सेलू : देवगावफाटा येथील महाविहार आम्रवनाचे हे पवित्र स्थळ भविष्यात सर्वच समाज बांधवांसाठी शांतीचा, समृद्धीचा संदेश देणारे केंद्र म्हणून नावारूपास येईल. या संपूर्ण परिसराच्या विकासासाठी बोर्डीकर परिवार कमी पडणार नाही, अशी ग्वाही जिंतूर-सेलूच्या आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी सोमवारी,२९ जुलैरोजी दिली. साहेबांनी पूर्ण मतदारसंघात गावोगावी डॉ.बाबासाहेबांचे पुतळे उभारण्याचे काम यासाठी केले की; आपली भावी पिढी त्यांच्याकडे पाहून ‘शिका, संघटित व्हा व संघर्ष करा’ अशी प्रेरणा घेत राहील, असेही त्या म्हणाल्या. या परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव पाठीशी असून आपणही मला पाठबळ द्यावे, असे आवाहनही आमदार बोर्डीकर यांनी यावेळी केले.

महाविहार आम्रवन : शांती, समृद्धीचा संदेश देणारे पवित्र केंद्र : आमदार मेघना बोर्डीकर

वर्षावास प्रारंभ तथा आषाढ पौर्णिमेचे औचित्य साधून सेलू् तालुक्यातील देवगावफाटा येथील आम्रवन महाविहार परिसरात तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या भव्य मूर्ती उभारणीचा पायाभरणी व धम्मदेसना कार्यक्रम थाटात संपन्न झाला.
अध्यक्षस्थानी माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, तर उद्घाटक म्हणून जिंतूर-सेलू मतदार संघाच्या आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांची उपस्थिती होती. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून भदंत शरणानंद महाथेरो, अखिल भारतीय भिकू महासंघाचे कार्याध्यक्ष डॉ.उपगुप्त महाथेरो, भदंत पय्यरत्न थेरो, भदंत मुदीतानंद थेरो, भदंत पय्या बोधी थेरो, भदंत शिलरत्न थेरो, भदंत शिवली शाक्यपुत्र, भदंत रेवतबोधी, भंते पय्यावंश, भंते संघरत्न आदींची उपस्थिती होती.

भागवत पंथ व धर्माचा उगम भगवान बुद्धाच्या विचारातूनच : डॉ.उपगुप्त महाथेरो

डॉ.उपगुप्त महाथेरो यांनी तथागत बुद्धांच्या महिमेची व त्यांच्या धम्माची महती विशद करत भागवत धर्म व पंथाची निर्मिती ही बुद्धाच्या विचारधारेतूनच निर्माण झाल्याची माहिती दिली.‌ संपूर्ण आशिया खंडात तथागतांच्या विचाराचा पायंडा पडला असून देशाच्या प्रत्येक ठिकाणी भव्य अशा बुद्धांच्या मूर्तीची उभारणी होत आहे. जपानमध्ये चारशे फूट उंचीची मूर्ती थाटात उभी असून संपूर्ण जगाला शांतीचा, करुणेचा अहिंसेचा संदेश देत सबंध मानव जातीच्या कल्याणासाठी प्रेरणाच देत असल्याचे सांगले. कित्येक दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. पण आमदार मेघना बोर्डीकरांच्या नावातच मेघ असल्याने कार्यक्रमात मेघ गरजला पण, बरसला नाही. अशी कौतुकाची थाप बोर्डीकरांना दिली. भंते संघरत्न यांनी या उभारणीच्या कामासाठी घेतलेल्या पुढाकाराचे त्यांनी कौतुक केले.

लेकीला मंत्रीमंडळात जाण्यासाठी बळ द्यावे : माजी आमदार बोर्डीकर

यावेळी माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकरांनी सांगितले की; लवकरच या बुद्ध मूर्तीचा लोकार्पण सोहळा संपन्न होईल. जवळच असलेल्या खंडोबा मंदिराच्या परिसराचे सुशोभिकरण करण्याससुद्धा बोर्डीकर परिवार वचनबद्ध असून सर्वच परिसराचा चौफेर विकास केला जाईल, असे सांगितले. बोर्डीकराने गेली २५ वर्षे आमदारकी भोगली पण, एक खंत सलते ती खंत म्हणजे मंत्री पदासाठी उपस्थितांनी दिदींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून आगामी निवडणुकीत लेकीला बळ देऊन दीदी मंत्रिमंडळात जावी ही राहिलेली बापाची इच्छा पूर्ण करावी,अशी साद घातली. तथागतांचे आशीर्वाद घेऊनच दीदी आपला विधानसभेचा फॉर्म  भरेल, असेही सांगितले.

भीमगीतांच्या कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद

या कार्यक्रमास उपासक व उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंचावरील सर्व पूज्य भंतेचा यांचा सत्कार करण्यात आला. अनुसूचित जाती जमाती मोर्चाच्या वतीने माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकरांचा, तर पंचशील महिला मंडळ व सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या वतीने आमदार मेघना बोर्डीकर यांचा सत्कार करण्यात आला. डॉ.पंडित दराडे, प्रमोद चव्हाण, गोपाल रोकडे, गोविंद थिटे, विलास भंडारे यांचाही सत्कार करण्यात आला. या निमित्ताने आयोजित भीम गीतांच्या कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला. प्रास्ताविकात भंते संघरत्न यांनी महाआम्रवन येथे आमदार मेघना बोर्डीकर यांच्या संकल्पनेतून व माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनात येथे भव्य बुद्ध मूर्ती उभारणी व परिसराच्या विकासाची सविस्तर माहिती त्यांनी दिली. सूत्रसंचालन प्रवीण वाकळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनुसूचित जाती मोर्चा तालुकाध्यक्ष विजयकुमार वाकळे, जिल्हा सरचिटणीस सुमेध सूर्यवंशी, विकास अण्णा मोरे गुणीरत्न वाकोडे, युवराज घनसावध, अक्षय सूर्यवंशी, विजय खंदारे, संदेश भालेराव, रविकिरण गजभारे, भगवान साळवे, अरुण गजभारे, बंडू गायकवाड, रोहिदास खंदारे, प्रतीक खिल्लारे, मुकुंद काळे, रमेश चव्हाण, सिद्धार्थ वाकळे, अमोल वाघ, राहुल शिंदे, शिवाजी वाकळे आदींसह भीमसैनिकानी परिश्रम घेतले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!