निम्नदुधनातून विसर्ग वाढणार; नदीकाठाच्या गावांना सतर्कतेचा इशारा

निम्नदुधनातून विसर्ग वाढणार; नदीकाठाच्या गावांना सतर्कतेचा इशारा

चार दरवाज्यात विसर्ग सुरू, दुपारी दोन वाजता आणखी चार दरवाजे उघडणार

सेलू (जि.परभणी) : सेलू (जि.परभणी) तालुक्यातील ब्रह्मवाकडी येथील निम्नदुधना प्रकल्पाच्या पाणीलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या जिवंत पाणीसाठ्यात मागील ५४ तासात ४७.९८ टक्क्यांची वाढ झाली आहे. धरणाचे क्रमांक एक, २०, ५ आणि १६ ही चार दरवाजे दुपारी बारा वाजता ०.५० मीटरने उचलून ६५२८ क्युसेक पाण्याचा विसर्ग दुधना नदीपात्रात सोडण्यात आला आहे. दरम्यान, दुपारी दोन वाजता पुन्हा चार दरवाजे उघडून विसर्ग वाढविण्यात येणार आहे. यामुळे एकूण १३०५६ क्युसेक्स विसर्ग होईल. या पार्श्वभूमीवर नदाकाठांच्या गावांना सतर्कतेचा इशारा निम्न दुधना प्रकल्प पूर नियंत्रण कक्षाने दिला आहे.

 

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!