चिमुकल्यांनी केले उत्साहात मातृपूजन; सेलूतील विवेकानंद बालक मंदिर उपक्रम

चिमुकल्यांनी केले उत्साहात मातृपूजन; सेलूतील विवेकानंद बालक मंदिर उपक्रम

सेलू : ‘आई’ या दोन अक्षरांची जादू या जगामध्ये अजरामर आहे. मुलांना जन्म देणं, त्यांचं मोठ्या ममतेनं संगोपन करणं ,शिक्षणाचं आणि संस्कारचं शिंपण करून त्याला घडविण्यात आईचा मोलाचा वाटा असतो .तिच्या कार्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विवेकानंद बालक मंदिरात मातृपूजन उपक्रम बुधवारी ४ सप्टेंबर रोजी उत्साहात पार पडला. प्रारंभी सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. बालवाडीच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आईचे पाय धुवून, हळदी- कुंकू व फुले, अक्षदा तसेच पुष्पहार घालून मातृपूजन केले.व्यासपीठावर हरिभाऊ चौधरी, करुणा कुलकर्णी, शंकर शितोळे यांची उपस्थिती होती.बालवाडीताई रसिका बावणे यांनी कार्यक्रमाची रूपरेषा ठरवली. सूत्रसंचालन विजय चौधरी, आभार रागिणी जकाते यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अनिल कौसडीकर, काशिनाथ पांचाळ, शारदा पुरी, सोनाली जोशी, मंगेश खरात यांनी प्रयत्न केले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!