सेलूतील एलआयसी कार्यालयात विमा सप्ताह उत्साहात 

सेलूतील एलआयसी कार्यालयात विमा सप्ताह उत्साहात 

सेलू : येथील भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या ६८ व्या वर्धापन दिनानिमित्त सेलू शाखेच्या वतीने २ ते ६ सप्टेंबर या कालावधीमध्ये विमा सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला. या विमा सप्ताहाच्या निमित्ताने सेलू भारतीय आयुर्विमा महामंडळ शाखेच्या वतीने, विमा कर्मचारी, विकास अधिकारी, अधिकारी यांच्यासाठी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते, स्पर्धांचे पारितोषिक वितरण कार्यक्रम ६ सप्टेंबर रोजी झाला. अध्यक्षस्थानी सहायक प्रशासन अधिकारी प्रभाकर भांडवले होते. याप्रसंगी योगेश जयभाय, नागेश पुराणिक, सुभाष राठोड यांची उपस्थिती होती.स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. विजेत्यांमध्ये प्रथम प्रभाकर भांडवले व दिव्तीय अमर पाटील तृतीय मन्मथ देवढे , समीर थोरात यांचा समावेश आहे. याप्रसंगी नागेश पुराणिक, शमशोदिन शेख, उपेंद्र बेल्लुरकर, भास्कर हिप्परगे, योगेश जयभाय, शिवाजी अघाव व संपत कपाळे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी शमशोदिन शेख,श्रीपती जगताप, कृष्णा बोराडे,भालचंद्र बरडे, राजकुमार नाईकवाडे, शंकर जिवने, संदीप जाधव, बबन झोल, दत्ता सरकटे आदी उपस्थित होते.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!