ईद-ए-मिलादनिमित्त रुग्णांना फळे वाटप

ईद-ए-मिलादनिमित्त रुग्णांना फळे वाटप

सेलू उपजिल्हारुग्णालयात कार्यक्रम

सेलू : इस्लाम धर्माचे प्रेषित महंमद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त १६ सप्टेंबर सोमवार रोजी सेलू शहरातील सेलू मुस्लिम एकता मंच व मुस्लीम समाज बांधवांच्या वतीने सेलू उप जिल्हारूग्णालयात रुग्णांना तसेच सेलू शहरातील रेल्वे स्थानक, बस स्थानक, मोंढा, क्रांती चौक, आठवडी बाजार आदी ठिकाणी फळे वाटप करण्यात आले. यावेळी शेख रईस खासमी ऊर्फ खाजा मौलाना,शेख रफीक भाई खन्ना, सय्यद नियाझ भाई, अबरार बेग, गौस लाला भाई, शेख अझीझ भाई गुत्तेदार, पठान लालू खान, शेख मुख्तार, शेख इस्माईल भाईमिया, बदरुद्दीन अन्सारी, शेख राजु, शेख नफिस बादशाह भाई,वाहेद पठान, शेख असद गुत्तेदार, अशोक थोरात साहेब,शेख शेरू बेलदार, शेख अझहर, मुशरफ पठान, गौतम वंजारेसह सेलू शहरातील मुस्लीम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!