ईदनिमित्त १४८ जणांचे सेलूमध्ये रक्तदान 

ईदनिमित्त १४८ जणांचे सेलूमध्ये रक्तदान 

सेलूतील युथ मूव्हमेंट ऑफ महाराष्ट्र युनिट आणि मुस्लिम बांधवांचा पुढाकार

सेलू/परभणी : इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहंमद पैगंम्बर यांच्या जन्म दिन आणि ईद-ए-मिलादुन्नबीनिमित्त सेलू शहरातील युथ मूव्हमेंट ऑफ महाराष्ट्र युनिटच्या वतीने, जमातें-ए_ हिंदचे शेख इमामुद्दीन यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी, १५ सप्टेंबररोजी आयोजित शिबिरामध्ये १४८ तरुणांनी रक्तदान केले. सुरुवातीला हाफेज अतिख सहाब फुरखानी यांनी कुराणच्या आयातचे पठन केले. याप्रसंगी अल फलाह एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अनिस इजिनिअर, निसार पठाण, शेख महेमूद, जावेद घोरी, मौजम शेख, शेख शमशोद्दीन, इम्मामोद्दीन, जुनेद यांची उपस्थिती होती. रक्त संकलनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढी,‌आरोग्य केंद्रातील अधिकार, कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. शिबिरासाठी नोमान सकलेन, शेख इम्मामोद्दीन, शोएब हाश्मी, मोईन सिद्दीकी, इब्राहिम बागवान, जब्बार खान, शेख मोहसीन, शेख बिलाल, जुबेद, विखार, जुबेर अमजद बागवान, शेख साजिद, अब्दुल मजीद, डॉ.मुताहेर, ॲडकरिम, मौलाना खाजा यांनी भेट दिली.

 

 

 

 

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!