न्यू हायस्कूलमध्ये समुपदेशन कार्यक्रम उत्साहात 

न्यू हायस्कूलमध्ये समुपदेशन कार्यक्रम उत्साहात 

सेलू : सेलू येथील न्यू हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन कार्यक्रम उत्साहात पार पडला.‌ सखी सावित्री व विशाखा समितीकडून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमास डॉअभिलाषा जोगदंड, ॲड.रूपाली आम्ले, पोलीस शिपाई राहूल गोरे, मुख्याध्यापक बी.ए. नाईकनवरे, पर्यवेक्षक धनंजय भागवत, प्रनयना तेलगोटे आदींची प्रमुख उपस्थिती होती. डॉ.जोगदंड यांनी गुडटच – बॅडटच, वैद्यकीय समस्या यावर, तर ॲड.आम्ले यांनी अल्पवयीन गुन्हेगारांसाठीचे कायदे, शिक्षा याविषयी माहिती दिली. पोलिस कर्मचारी गोरे यांनी गुन्हे व शिक्षा तसेच विविध विद्यार्थ्यांना उपयोगी असणारे फोन नंबर यांची माहिती दिली. प्रास्ताविक धनंजय भागवत यांनी केले. सूत्रसंचालन डी.एस.मोरे यांनी केले. रामेश्वर गाडेकर यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी शेषराव नागरे, मंजुषा रेंगे, विष्णू गजमल, नारायण काष्टे आणि शिक्षकांनी सहकार्य केले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!