विधानसभा निवडणूक : बोर्डीकर, नागरे, दुधगावकर यांचे अर्ज दाखल
बुधवंत, काजळे, काष्टे यांच्यासह ११ उमेदवारांनी दाखल केले अर्ज
जिंतूर/ परभणी : ९५-जिंतूर विधानसभा मतदारसंघात सोमवारी, २८ ऑक्टोबररोजी 10 उमेदवारांनी 19 अर्ज घेतले. एकूण 11 उमेदवारांनी 13 नामनिर्देशन पत्र सादर केले. आजपर्यंत 23 उमेदवारांनी 27 नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सोमवारी मोठी गर्दी झाली होती. मेघना दिपक साकोरे बोर्डीकर (भाजप), सुरेश कुंडलीकराव नागरे यांनी अपक्ष व वंचित बहुजन आघाडी, डॉ. प्रभाकर रंगराव बुधवंत यांनी अपक्ष व राष्ट्रीय समाज पक्ष आदींंसह अपक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
सोमवारी 95- जिंतूर विधानसभा मतदारसंघातर समीरराव गणेशराव दुधगावकर (अपक्ष), प्रेक्षा विजय भांबळे (अपक्ष), डॉ. प्रभाकर रंगराव बुधवंत यांनी अपक्ष व राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने प्रत्येकी एक, शेख सलीम शेख इब्राहीम (ऑल इंडिया मजलीस ई इन्कनाब ई मिलत), मेघना दिपक साकोरे बोर्डीकर (भाजप), राजीव किसनराव पंचागे (अपक्ष), मुंजाजी साहेबराव कदम (अपक्ष), अंकुश सिताराम राठोड (अपक्ष), प्रसाद ज्ञानेश्वर काष्टे (अपक्ष), गणेश जगन्नाथ काजळे (अपक्ष), सुरेश कुंडलीकराव नागरे यांनी अपक्ष व वंचित बहुजन आघाडीच्यावतीने प्रत्येकी एक, अमृता सुरेशराव नागरे (अपक्ष) यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. आजपर्यंत 50 उमेदवारांना 90 नामनिर्देशन पत्र वितरीत करण्यात आले आणि एकूण 11 उमेदवारांनी 13 नामनिर्देशन पत्र सादर केले. आजपर्यंत 23 उमेदवारांनी 27 नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत.