अशोक नायगावकर यांची हास्यकाव्य ‘मिश्किली’ उद्या

अशोक नायगावकर यांची हास्यकाव्य ‘मिश्किली’ उद्या

सेलूमध्ये विनोद बोराडे मित्रमंडळावतीने आयोजन, साई नाट्यगृहात सायंकाळी ५:३० वाजता कार्यक्रम

सेलू/परभणी : सेलू येथील माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे मित्रमंडळाच्या वतीने सोमवार, १६ डिसेंबररोजी सायंकाळी साडे पाच वाजता साई नाट्यगृहात प्रसिद्ध हास्य कवी अशोक नायगावकर यांच्या ‘मिश्किली ‘ या हास्य कवितांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दैनंदिन जीवनातील प्रसंगांना मिश्कीलपणे टिपून हास्यकल्लोळाची आनंदाभुती देणाऱ्या आणि जीवनातील ताणतणाव क्षणभरासाठी दूर करणाऱ्या हास्यकवी नायगावकर यांच्या या हास्य कवितांच्या कार्यक्रमास श्रोत्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजक माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!