काजळी रोहिणा येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे उद्घाटन

काजळी रोहिणा येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे उद्घाटन

सेलूतील नूतन महाविद्यालयाच्या वतीने विविध कार्यक्रम

सेलू/परभणी : सेलू तालुक्यातील काजळी रोहिणा येथे नूतन महाविद्यालयाच्या वतीने ‘युथ फॉर डिजीटल लिटरसी’ या विषयावर आयोजित सात दिवशीय राष्ट्रीय सेवा योजनेच्या वार्षिक शिबिराचे उद्घाटन राजश्री शाहू महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विठ्ठल घुले यांच्या हस्ते बुधवारी, १५ जानेवारी रोजी झाले.

अध्यक्षस्थानी संस्थेचे कार्यकारणी सदस्य अध्यक्ष दत्तराव पावडे होते. या वेळी प्राचार्य डॉ. उत्तम राठोड, सरपंच अर्चना इंद्रोके, भारत इंद्रोके, मुंजाभाऊ काष्टे, भारत काष्टे, राजू वाव्हाळे, परमेश्वर काष्टे, सचिन इंद्रोके, प्रसाद गोरे, शरद काष्टे, विनायक महाराज काष्टे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

या वेळी प्राचार्य डॉ.विठ्ठल घुले म्हणाले, की आडमार्गाने जाणाऱ्यांसाठी बेकारी आहे. जे चांगल्या मार्गाने जातात त्यांच्यासाठी बेकारी अजिबात नाही. भूतकाळात घडलेल्या गोष्टींमधून सतत शिकत रहा. वेळेचा सदुपयोग करत भविष्याचा वेध घेऊन ध्येय ठरवा. २१ जानेवारी पर्यंत चालणाऱ्या या शिबिरात विविध कार्यक्रम, उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत.  प्रास्ताविक प्रा.डॉ.सुरेश उगले यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.एस. बी.नायकल यांनी केले. डॉ आर.जे.नाथानी यांनी आभार मानले.शिबिरासाठी प्राध्यापक डॉ.सुरेश उगले, प्रा.डॉ.कीर्ती निराळवाड, प्रा.डॉ.शिवराजआदीं परिश्रम घेत आहेत.


फोटो- सदाशिव  महाजन, सेलू

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!