शेतकऱ्यांसाठी शून्य ऊर्जेवरील शीतकक्ष प्रात्यक्षिक

शेतकऱ्यांसाठी शून्य ऊर्जेवरील शीतकक्ष प्रात्यक्षिक

सेलूतील बोर्डीकर कृषी महाविद्यालयाचा उपक्रम 

सेलू : सेलू येथील बोर्डीकर कृषी महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थिनींनी वालूर येथे शून्य ऊर्जेवर आधारित शीतकक्ष तयार करण्याचे प्रात्यक्षिक यशस्वीरीत्या दाखवले. हा नाविन्यपूर्ण शीतकक्ष भाजीपाला आणि फळांच्या योग्य साठवणुकीसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतो. वालूर येथे पार पडलेल्या या प्रात्यक्षिकादरम्यान, कृषीकन्यांनी शेतकऱ्यांना विटा, वाळू, बांबू आणि वाळलेल्या गवताचा वापर करून अत्यंत कमी खर्चात शीतकक्ष कसा तयार करायचा, हे समजावून सांगितले. अशा प्रकारच्या कक्षामुळे पालेभाज्या व फळांची नासाडी टाळता येते आणि त्यांची साठवणूक अधिक प्रभावीपणे करता येते.

यावेळी, कृषीकन्यांनी शीतकक्ष उभारणीसाठी महत्त्वपूर्ण सूचना दिल्या.‌ यामध्ये कक्षाचा आकार साधारणपणे ५x५x३ फूट असावा. शीतकक्ष नेहमी सावलीच्या जागी उभारला जावा. कक्षावर झाकण्यासाठी बांबूचे किंवा नारळाच्या झावळीचे छत तयार करावे. फळे व पालेभाज्या साठवण्यापूर्वी कक्ष पूर्णपणे भिजवून घ्यावा. या प्रात्यक्षिकात सहभागी २७ कृषीकन्यांना महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. ए.ए. चव्हाण, कार्यक्रम समन्वयक डॉ. नीरज चव्हाण आणि डॉ. एन.आर. गटकळ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

 

 

 

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!