राज्य सेपक टकारा स्पर्धेसाठी परभणी जिल्हा वरिष्ठ गट संघ रवाना
सेलू : महाराष्ट्र राज्य सेपक टकारा असोसिएशनच्या मान्यतेने आणि नाशिक जिल्हा सेपक टकारा असोसिएशनच्या वतीने नाशिक येथे दिनांक २८ ते ३० जून २०२५ दरम्यान राज्यस्तरीय वरिष्ठ गट पुरुष व महिला सेपक टकारा क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेसाठी सेपक टकारा असोसिएशन ऑफ परभणीतर्फे परभणी जिल्हा पुरुष संघाची निवड चाचणी दिनांक २१ जून २०२५ रोजी जिजाऊ ज्ञानतीर्थ माध्यमिक विद्यालय, मानवत रोड रेल्वे स्टेशन येथे घेण्यात आली. यावेळी पर्यवेक्षक सुरेश भिसे तसेच क्रीडा शिक्षक माणिक मगर, गणेश माळवे आणि कैलास टेहरे उपस्थित होते.
दिनांक २२ ते २६ जून दरम्यान नूतन विद्यालय, सेलू येथे संघाचे प्रशिक्षण शिबिर पार पडले. त्यानंतर, दिनांक २७ जून रोजी परभणी जिल्हा पुरुष संघ नाशिक येथे होणाऱ्या राज्य सेपक टकारा क्रीडा स्पर्धेसाठी रवाना झाला.
परभणी जिल्हा सेपक टकारा संघातील खेळाडू: अनुराग आंबटी, विजय चौधरी, निलेश बानाटे, साई पोफळे, रामराव कांदे, आर्यन गायके, निलेश काळके, पांडुरंग केंद्रे, जगदीश लहाने, गणेश आम्ले, जितेश भिसे, ऋषिकेश मुंढे, शुभम पवार, ईश्वर अर्जुने आणि विनोद सोळंके. संघाचे प्रशिक्षक म्हणून कैलास टेहरे आहेत.
राज्य स्पर्धेसाठी रवाना झालेल्या संघाला जिल्हाध्यक्ष आमदार राजेश विटेकर, नितीन लोहट, राजेंद्र मुंढे, मोहम्मद इकबाल, बाबासाहेब राखे, गणेश माळवे, सज्जन जैस्वाल आणि प्रशांत नाईक, अब्दुल अन्सार यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.