ज्ञानतीर्थ विद्यालयातील शिक्षक नारायण चौरे यांची राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड
सेलू/परभणी : सेलू येथील श्रीराम प्रतिष्ठानच्या ज्ञानतीर्थ माध्यमिक विद्यालयातील विज्ञान शिक्षक नारायण चौरे यांच्या शैक्षणिक साहित्याची ५२ व्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. राज्य विज्ञान मंडळ रविनगर नागपूर व शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित जिल्हा विज्ञान प्रदर्शनात श्री.चौरे यांच्या विज्ञान शैक्षणिक साहित्याला माध्यमिक गटात प्रथम क्रमांक मिळाला आहे. मागील वर्षीही त्यांनी राज्यस्तरीय प्रदर्शनात यशस्वी सहभाग नोंदविला होता. चौरे यांनी त्यांच्या कृतिशील अध्यापनातून हे शैक्षणिक साहित्य तयार केले आहे. या यशाबद्दल संस्थापक अध्यक्ष डॉ संजय रोडगे, सचिव डॉ.सविता रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्रा. महादेव साबळे आदींसह मुख्याध्यापक व शिक्षकांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.