श्रीमद् भागवत मंगल कलश मिरवणूक उत्साहात

श्रीमद् भागवत मंगल कलश मिरवणूक उत्साहात

सेलूमध्ये ब्रह्माकुमारी विद्यालयाच्या गीता ज्ञान महोत्सवाला सुरुवात 

श्रीमद् भागवत मंगल कलश मिरवणूक उत्साहात

सेलू : येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने २७ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत सेलू येथील श्री साईबाबा मंदिरात राष्ट्रीय प्रवचनकार राजयोगिनी भारतीदीदी यांच्या अमृततुल्यवाणीतून श्रीमद् भगवद्गीता ज्ञान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवानिमित्त सोमवारी सकाळी अकरा वाजता मंगल कलश यात्रा मिरवणूकीला उत्साहात सुरुवात झाली. ढोल ताशांच्या गजरात बसस्थानक, रेल्वे स्थानक रोड, संत गोविंदबाबा चौक, क्रांती चौक मार्गाने साईबाबा मंदिरात समारोप झाला. अश्वरथामध्ये भारती दीदी व सुमन दीदी विराजमान होत्या‌. मिरवणुकीत

मंगल कलश धारी महिला, परभणी येथील साईबाबा प्राथमिक शाळेच्या मुलींच्या लेझीम पथकाने शिक्षक दिनेश सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली लेझीम प्रात्यक्षिके तसेच सेलू येथील यशवंत विद्यालयाच्या मुलींनी छाया कोतवाल, अनुराधा नावाडे यांच्या मार्गदर्शनाखाली टिपरी नृत्य सादर करून लक्ष वेधले‌. महोत्सवानिमित्त दररोज सकाळी ६ ते ७ म्युझिकल एक्झरसाइज मेडिटेशन, तसेच सकाळी ७ ते ८ तणामुक्त खुशनुमा जीवन शिबिर आणि सायंकाळी साडेपाच ते साडेआठ या वेळेत राष्ट्रीय प्रवचनकार राजयोगिनी भारतीदीदी यांच्या अमृततुल्यवाणीतून श्रीमद् भगवद्गीता प्रवचन श्रवणाची संधी श्रोत्यांना मिळणार आहे. महोत्सवातील विविध कार्यक्रमाचा श्रोत्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन समारोपप्रसंगी करण्यात आले आहे. मिरवणुकीत ब्रह्माकुमारी शांता दिदी‌, नंदा दीदी, अर्चना दीदी, सविता दीदी, सरिता दीदी, शारदा दीदी, योगिता दीदी, वैष्णवी दीदी, वैशाली दिदी, सीमा दीदी, प्रणिता दीदी, राधा दीदी, शिल्पा दीदी, रेखा दीदी, रूपा दीदी, सारिका दिदी, श्रुती दीदी, रूपाली दीदी, जया दिदी, सोनू दीदी आदींसह ब्रह्माकुमारी परिवारातील भाई, बहेन, शहरातील मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!