मराठी पत्रकार परिषद : राज्यस्तरीय पत्रकार मेळाव्याची सेलूमध्ये जय्यत तयारी

मराठी पत्रकार परिषद : राज्यस्तरीय पत्रकार मेळाव्याची सेलूमध्ये जय्यत तयारी

स्वागताध्यक्ष विनोद बोराडे यांची माहिती : पालकमंत्री बोर्डीकर, शिरसाट यांच्या उपस्थितीत उद्घाटन, विविध कार्यक्रम 

सेलू/परभणी (बाबासाहेब हेलसकर) : मराठी पत्रकार परिषद मुंबई आयोजित, रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा व वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळा व तालुकाध्यक्षांचा राज्यस्तरीय मेळावा सेलू (जि.परभणी) येथे उद्या शनिवारी, एक फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. विविध समित्यांद्वारे मेळाव्याची जय्यत तयारी झाली आहे. स्वागताध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, संयोजक तथा सेलू तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष लक्ष्मण बागल यांनी ही माहिती दिली. या वेळी पदाधिकारी उपस्थित होते.

साई नाट्यगृहात सकाळी दहा वाजता पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते उद्घाटन आहे. प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट, प्रमुख वक्ते म्हणून पत्रकार विशाल परदेशी उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख, तर स्वागताध्यक्ष माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे आहेत. विश्वस्त किरण नाईक, शरद पाबळे, अध्यक्ष मिलींद अष्टीवकर, आमदार राजेश विटेकर, माजी आमदार विजयराव भांबळे, माजी आमदार हरिभाऊ लहाने, श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ.संजय रोडगे, साईबाबा बँकेचे अध्यक्ष हेमंतराव आडळकर, उद्योजक सेलूभुषण नंदकिशोरजी बाहेती, जयप्रकाशजी बिहाणी, जिपचे माजी सभापती अशोक काकडे, मनसे जिल्हाध्यक्ष शेख राज यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

याप्रसंगी साहित्यिक तथा पत्रकार डॉ.आसाराम लोमटे, डी.व्ही.मुळे, कांचन कोरडे यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन सरचिटणीस प्रा.सुरेश नाईकवाडे, मोहंमद इलियास, सेलू तालुकाध्यक्ष लक्ष्मण बागल, संजय मुंढे, निसार पठाण, सचिव शेख मोहसिन, सतिष आकात यांनी केले आहे.

मेळाव्याच्या यशस्वितेसाठी रेवणअप्पा साळेगांवकर, रामेश्वर बहिरट, डॉ.विलास मोरे, अबरार बेग, रमेश खराडे, राहूल खपले, दिलीप मोरे, पुनमचंद खोना, संतोष गरड, महादेव गिरी, निशीकांत रोडगे, रोहित झोल, असगर खाँन, जावेद कुरेशी, श्रीपाद रोडगे, नितीन कुंभकर्ण, निरज लोया, संदीप वरकड, दिपक जडे, महेश राऊत, विठ्ठल राऊत, गणेश सवणे, वसंत आवटे, लक्ष्मण मानोलीकर, राजू हाट्टेकर, मन्सुर शेख, प्रकाश कांबळे, सचिन शिवशेट्टे, शिवराज काटकर, अनिल वाघमारे, रवी उबाळे, प्रभू दिपके आदींसह परभणी जिल्हा संयोजक सेलू् तालुका पत्रकार संघाचे पदाधिकारी व सदस्य पुढाकार घेत आहेत.

रॅली, प्रदर्शनासह विविध कार्यक्रम-मेळाव्याच्या निमित्ताने राज्यभरातील पत्रकार उपस्थित राहणार आहेत. सकाळी नऊ वाजता लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यापासून रॅली काढण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील माहिती अधिकारी सुनील पोटेकर यांच्या संयोजनात परभणी जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळाची माहिती देणारे प्रदर्शनही भरविण्यात येणार आहे. विविध पुरस्कारांचे वितरण, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!