यशवंत प्राथमिक शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात

यशवंत प्राथमिक शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात

यशवंत प्राथमिक शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात

सेलू : सेलू येथील य़शवंत शिक्षण प्रसारक मंडळाच्या यशवंत प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन गुरूवारी, ३० जानेवारीरोजी उत्साहात पार पडले. अध्यक्षस्थानी संचालक साईराज मुकेशराव बोराडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त उपक्रमशील शिक्षक माधव गव्हाणे, तर व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष मुकेशराव बोराडे, व्यंकटराव चव्हाण, राजेश झोडगावकर, मुख्याध्यापक रामप्रसाद गोरे, रतन थटवले आदींची प्रमुख उपस्थिती होती.

माधव गव्हाणे यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व पटवून दिले त्याचबरोबर विविध उपक्रमांची माहिती दिली. विविध गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विविध क्रीडा,  सांस्कृतिक स्पर्धा तसेच विविध स्पर्धा परीक्षांतील यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. साईराज बोराडे यांनी अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन  केले. प्रास्ताविक रामप्रसाद गोरे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय श्री थटवले यांनी दिला. सूत्रसंचालन अनुराधा कानडे यांनी केले. विष्णू वामन यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  शिक्षक इतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!