38 वी राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धा : महाराष्ट्र राज्य महिला व पुरुष संघास रौप्यपदक 

38 वी राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धा : महाराष्ट्र राज्य महिला व पुरुष संघास रौप्यपदक 

गणेश माळवे, डेहराडून (उत्तराखंड) : 38 वी नॅशनल गेम्स डेहराडून येथे टेबल टेनिस क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्य पुरुष व महिला संघाने दुहेरी रौप्यपदक पटकावले आहे.

अंतिम सामना महाराष्ट्र वि वेस्ट बंगाल दरम्यान स्वस्तिका घोष वि. सुर्तिभा मुखर्जी दरम्यान 8-11, 11-6,12-14, 11-13, 5-11 स्वस्तिका घोष 3-2 सेट ने पराभूत. कर्णधार दिया चितळे वि. अहीका मुखर्जी 12-10,11-6,11-6 , दिया चितळे 3 सेट विजयी. तनिषा कोटेचा वि. पोयमाती बैस्या 8-11, 7-11,11-6, 6-11. 1-3 सेट ने तनिषा कोटेचा पराभूत. स्वस्तिका घोष वि अहिका मुखर्जी 8-11, 6-11,11-13 अहीका मुखर्जी 3-0 सेट विजयी होऊन 2-1 सेट ने वेस्ट बंगाल विजेता तर महाराष्ट्र उपविजेता ठरला.

महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस क्रीडा स्पर्धेत उपविजेता संघात कर्णधार दिया चितळे, स्वस्तिका घोष, तनिषा कोटेचा,सायली वाणी,रिथा टेनिसशन यांचा समावेश होता संघास प्रशिक्षक सुनील बाब्रास तर संघ व्यवस्थापक म्हणून गणेश माळवे यांनी काम पाहिले.

अंतिम सामना पुरुष गटात महाराष्ट्र वि.वेस्ट बंगाल दरम्यान जश मोदी वि. अंरबिन घोष दरम्यान 7-11,12-10,11-6, 6-11, 4-11 अंरबिन घोष 3-2 सेट ने विजयी ठरला. रेगन अल्बुकर्क वि. अंरबिन घोष दरम्यान 5-11,8-11,10-12 सरळ 3-0 मध्ये अंरबिन घोष विजयी ठरला. चिन्मय सोमय्या वि. सौरव शाह 7-11,8-11, 11-8, 8-11,सौरव शाह ने 3-1 सेट सामना जिंकून वेस्ट बंगाल विजेता तर महाराष्ट्र उपविजेता ठरला

महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक पटकावले यात संघात सिध्देश पांडे कर्णधार, जश मोदी, रेगन अल्बुकर्क, चिन्मय सोमय्या, दिपीत पाटील,यांचा समावेश होता.संघाचे प्रशिक्षक महेंद्र चिपळूणकर तर संघ व्यवस्थापक म्हणून श्रीराम कोनकर यांनी काम पाहिले. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन पदक प्रमुख संजय शेट्टे , स्मिता शिरोळे ,उप पथक प्रमुख प्रा.सुनील पूर्णपाञे यांनी महाराष्ट्र संघास भेट देऊन प्रोत्साहन दिले. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे,सरचिटणीस नामदेव शिरगावकर , टेबल टेनिस राज्य अध्यक्ष प्रविण लुंकड, राज्य सरचिटणीस यतिन टिपण्णीस, प्रकाश तुळपुळे यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!