अनेक समर्थकांसह अशोक काकडे भाजपामध्ये

अनेक समर्थकांसह अशोक काकडे भाजपामध्ये

मुंबईत प्रदेश कार्यालयात झाला पक्ष प्रवेश सोहळा

पालकमंत्री म्हणून मेघना बोर्डीकर यांचे विकासाभिमुख नेतृत्व परभणी जिल्ह्याला लाभले आहे. मागील अनेक वर्षापासून आपण जिथे राहिलो तिथे निष्ठेने काम केले आहे.सेलू, जिंतूरसह परभणी जिल्ह्याच्या विकासकामांना गती मिळण्याच्या दृष्टीने भारतीय जनता पक्षात निष्ठेने आणि प्रामाणिकपणे काम करणार आहे. – अशोक काकडे, माजी जिप सभापती, परभणी

अनेक समर्थकांसह अशोक काकडे भाजपामध्ये

सेलू (जि.परभणी) :  तालुक्यातील अनेक समर्थकांसह राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे मातब्बर नेते तथा जिल्हा परिषदेचे माजी सभापती अशोक काकडे यांनी मंगळवारी, ११ फेब्रुवारीरोजी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. दरम्यान, प्रवेश सोहळ्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात अशोक काकडे यांचे स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
मुंबई येथील भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयात सायंकाळी पक्ष प्रवेश सोहळा झाला. या वेळी प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महामंत्री संजय केनेकर, जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, अशोक काकडे, प्रभाकर वाघीकर, सुरेश भुमरे, दिनकर वाघ, तालुकाध्यक्ष दत्तराव कदम, प्रसाद खारकर, अशोक उफाडे आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. या वेळी केनेकर म्हणाले की, भारतीय जनता पक्षाची शत:प्रतिशत भाजपा ही संकल्पना परभणी जिल्ह्यातील ग्रामीण भागातून पुढे आणण्यासाठी काकडे यांचा पक्ष प्रवेश पूरक ठरणार आहे. माजी आमदार बोर्डीकर म्हणाले की, काकडे आणि त्यांचे समर्थक भाजपची शक्ती वाढविण्यासाठी नक्कीच प्रयत्न करतील. अशोक काकडे म्हणाले की, पालकमंत्री म्हणून मेघना बोर्डीकर यांचे विकासाभिमुख नेतृत्व परभणी जिल्ह्याला लाभले आहे. मागील अनेक वर्षापासून आपण जिथे राहिलो तिथे निष्ठेने काम केले आहे. सेलू, जिंतूरसह परभणी जिल्ह्याच्या विकासकामांना गती मिळण्याच्या दृष्टीने भारतीय जनता पक्षात निष्ठेने आणि प्रामाणिकपणे काम करणार आहे. या वेळी शिवसेना (उबाठा) तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अनेक सरपंच, जिप व पंचायत समिती, नगरपालिका , ग्रामपंचायत, बाजार समितीचे आजी माजी पदाधिकारी आणि काकडे यांच्या समर्थकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. प्रास्ताविक अशोक उफाडे यांनी केले.

परभणी जिल्हा परिषदेचे माजी सभापती अशोक काकडे व त्यांच्या समर्थकांच्या भारतीय जनता पक्ष प्रवेशामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सेलू, जिंतूर विधानसभा मतदारसंघात भाजपची ताकद निश्चितच वाढणार आहे. त्यासाठी सर्वजण प्रयत्न करतील. कारण आता आपले लक्ष आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हेच आहे. – मेघना साकोरे-बोर्डीकर, पालकमंत्री, परभणी

यांनी केला भाजपामध्ये प्रवेश

या वेळी सेलू शहर व ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनेक आजी-माजी पदाधिकाऱ्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. यामध्ये माजी नगरसेवक मनीष कदम (शिवसेना उबाठा शिवसेना) ॲड.अशोक फोपसे, आशा नरेंद्र दिशागत (माजी नगरसेवक, उबाठा शिवसेना) प्रफुल उर्फ बाळू शेठ गिल्डा, कैलासराव काळे, बाबासाहेब राखे, अशोक उफाडे, सचिन धापसे, नवनाथ खांडेकर, ओम खेडेकर, राहुल कदम, माजी जिप सदस्य रमेशराव माने, बाजार समिती संचालक माऊली राऊत, माजी पंचायत समिती सदस्य संपतराव राठोड, सरपंच नबाजीराव खेडेकर!( शिराळा) विजय भुजबळ ( खेर्डा), रमेशराव शिंदे (राव्हा), दिगंबर बुधवंत (पिंपळगाव गोसावी) बाबासाहेब काकडे (राजुरा), मधुकर सोळंके (सोनवटी), अशोक खरात (जिवाजी जवळा) मुंजाभाऊ काष्टे (काजळी रोहीणा), माऊली राठोड (पारडी), कल्याण जोगदंड (तिडी पिंपळगाव), अनिल वांढेकर (निरवाडी), बळीराम मगर (करडगाव), जगन्नाथ भाबट (खादगाव), अंकुश सोळंके,‌ संजय इघारे (गव्हा), सतीश गटकळ (गोहेगाव) शिवाजीराव गजमल (डासाळा), मंचक अंभोरे (मापा), अमोल आढे (वालूर), रमेश दापसे, धारोजी धाबे, सतीश कलाल, दादामिया कुरेशी, प्रभाकर कुंडलिकराव इक्कर (हट्टा), बाबासाहेब भदर्गे, सुरेश वांडेकर, पांडुरंग धर्मे, बाबुराव (निरवाडी), विकास काकडे, अर्जुन काकडे प्रभाकर काकडे, अनंत जाधव, (तांदुळवाडी) संदीप काष्टे, राधाकिसन राजाराम, पंकज निकम, गोरे, विनोद शेरे, राहुल केवारे, राजू चव्हाण, पंकज चव्हाण, संजय मोगरे, आबा माळकर, अक्षय साळवे, अनिकेत शिंदे, सोमनाथ गजमल, चेतन निकम, सदाशिव पुरी आदींनी प्रवेश केला.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!