जनसहयोग सेवाभावी संस्थेची वक्तृत्व स्पर्धा उत्साहात

जनसहयोग सेवाभावी संस्थेची वक्तृत्व स्पर्धा उत्साहात

परभणी : राष्ट्रीय एकात्मकताचे प्रतीक असलेल्या परभणीचे सुफीसंत हजरत सय्यद शाह तुरबुल हक्क यांच्या ११८व्या उर्सानिमित वक्फ बोर्ड प्रशासन व जनसहयोग सेवाभावी संस्थेच्या वतीने रविवार ९ फेब्रुवारी रोजी दर्गाह परीसरात असलेल्या मास्टर कॅफे फंक्शन हॉल येथे घेण्यात आलेला वक्तृत्व स्पर्धा कार्यक्रम व बक्षीस वितरण सोहळा,आदर्श शिक्षक पुरस्कार,महारष्ट्ररत्न पुरस्कार सोहळा उत्सहात संपन्न झाला.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून परभणी शहरातील प्रसिद्ध विधीतज्ञ अशोक सोनी तर उद्घाटक म्हणून वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाचे केंद्र समन्वयक तथा शास्त्रज्ञ डॉ.नीता गायकवाड हे उपस्थित होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त उप जिल्हाधकारी विश्वंभर गावंडे,रेल्वे कॉन्ट्रॅक्टर एजाज फारुखी,जिल्हा वक्फ अधिकारी इमरान खान,शिवसेना नेते जलील पटेल,राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी नेते गफ्फार मास्टर, इंजीनियर जावेद शेख, पोलिस उप निरीक्षक इरफान इनामदार,फरहा नाज अंजुम,सना एजुकेशन सोसायटी सचिव सय्यद मुजाहिद अली, गव्ह.कॉन्ट्रैक्टर सय्यद गैस मोहियोद्दीन,मोहम्मद सरफराज अहेमद,पोलिस कांस्टेबल सय्यद शाकीर,फहीम काझी,ज्येष्ठ पत्रकार मदन बापू कोल्हे रफराज शेख,युवा नेते शाहेद भय्या सिद्दीकी,ए.स्टार न्यूज चॅनलचे संपादक अबरार बेग,समाजभूषण बशीर अहेमद पत्रकार अंसर हुसैन रिजवी,पत्रकार मोबिन खान पठाण, अख्तर नईम सर आदी उपस्थित होते.या वेळी कार्यक्रमाचे संयोजक महेमूद खान यांनी उपस्थीत मान्यवरांचा स्वागत सत्कार केले.सदरील कार्यक्रमात परभणी शहरातील जवळ पास जवळपास 500 उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.उपस्थीत मान्यवरांच्या हस्ते सर्व विजेत्यांना स्पर्धकांना पारितोषिके वितरित करण्यात यावेळी विविध शाळेतील शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना महाराष्ट्रात न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी परभणी शहरातील विविध शाळेतील विद्यार्थी मुख्याध्यापक शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा अरुण पडघन शिक्षक जावेद अन्सारी शिक्षक असेफ फुसेन अन्सारी यांनी केले तर आभार प्रदर्शन कार्यक्रमाचे संयोजक मेहमूद खान यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक सय्यद मुश्ताक ,शोएब खान शहेबास खान मोहीब खान व ईखरा शाळेतील शिक्षकांनी परिश्रम घेतले

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!