पालक सचिव दीपक कपूर यांच्याकडून मुळी बंधाऱ्याची पाहणी
परभणी : जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव तथा जिल्ह्याचे पालक सचिव दीपक कपूर यांनी मुळी येथे शुक्रवारी, २१ फेब्रुवारीरोजी दुपारी भेट देऊन निम्न पातळी बंधाऱ्याची पाहणी केली.
यावेळी मुख्य अभियंता लाभक्षेत्र विकास जयंत गवळी, अधीक्षक अभियंता अ. आ. दाभाडे, अधीक्षक अभियंता यांत्रिक मंडळ नांदेड पी. पी. देशमाने, अधीक्षक अभियंता लाभक्षेत्र विभाग मंडळाचे स. को. सब्बीनवार, अधीक्षक अभियंता बीड प्रकल्प मंडळ आय. एम. चिश्ती, अधीक्षक अभियंता गुणयांत्रिक मंडळ, संभाजीनगर व्ही. एच. पाटील. अधीक्षक अभियंता बीड श्रीमती प. को. जगताप, कार्यकारी अभियंता लघुपाटबंधारे परभणी सी. एन. ताटे, कार्यकारी अभियंता माजलगाव पी. बी.लांब, कार्यकारी अभियंता यांत्रिकी विभाग नांदेड आय. एम. आत्राम, तहसीलदार उषाकिरण श्रृंगारे आणि कंत्राटदार गौस मोहियोद्दिन आदि उपस्थित होते.
पैठणच्या नाथसागर धरणाच्या व्यतिरिक्त गोदावरी नदीवर नांदेडच्या विष्णुपुरी प्रकल्पापर्यंत १४ बंधारे असून, मुळी येथील १० वा बंधारा आहे. हा बंधारा गोडबोले पद्धतीचे गेट असलेला पायलट प्रोजेक्ट आहे.२०१२ आणि २०१६ मध्ये दोन वेळा हा बंधारा महापुराच्या पाण्याने क्षतिग्रस्त झाला. वेळोवेळी बांधकामासाठी मिळालेल्या निधीतून हा बंधारा १९ ऑक्टोबर २०२४ रोजी पूर्ण झाल्याचे सांगून येथे ११.३५ दलघमी पाणीसाठा आहे. १०३ कोटी रुपयांमध्ये हा बंधारा पूर्ण झाला असून, येथील पाण्यामुळे १७०५ हेक्टर सिंचन होत असल्याचे कार्यकारी अभियंता लघुपाट बंधारे परभणी सी. एन. ताटे यांनी सांगितले.
पालक सचिव दीपक कपूर यांनी मुळी निम्न पातळी बंधा-यावर जलपूजन केले.