प्रिन्स इंग्लिश स्कूलची शैक्षणिक सहल उत्साहात

प्रिन्स इंग्लिश स्कूलची शैक्षणिक सहल उत्साहात

पंचतारांकित हॉटेलमध्ये विशेष मेजवानी देऊन सन्मान 

सेलू/परभणी : सेलू येथील श्रीराम प्रतिष्ठानच्या एल.के.आर.रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूलतर्फे शालेय स्तरावरील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या‌ पर्पल कॅप प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांची वेरूळ लेणी, श्री घृष्णेश्वर मंदिर, छत्रपती संभाजीनगर शैक्षणिक सहल २ मार्च रोजी उत्साहात पार पडली.

यामध्ये इयत्ता पहिली ते नववीचे अरनेश नाईकनवरे, रिधान जोगदंड, माधवी साळुंखे, रिद्धी डासाळकर, प्रियाल बेनवाड, तनुश्री जाधव, समर्थ सुरवसे, समृद्धी सुरवसे, प्रज्वल रोडगे, आशिष रोडगे, प्रेरणा कास्टे, उन्नती राठी, आरव कुमार, शिवम फाटे, गौरी अबूज, प्रियल राठोड, तेजश्री चौधरी, तत्वमसी शिंदे , अभिराज मोगल, समर्थ मगर, वरद कुटे, सानवी मरेवार, हर्षल जाधव अजित झाडे, अनिकेत आंबेकर, श्रीनिवास पाटील, तनिष्का तेलभरे व क्षितिजा खजिने आदींचा समावेश होता.

या गुणवंतांचा शाळेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.संजय रोडगे यांच्या हस्ते एका पंचतारांकित हॉटेलमध्ये विशेष मेजवानी देऊन सन्मान करण्यात आला. या वेळी सचिव डॉ.सविता रोडगे, प्राचार्य कार्तिक रत्नाला व शिक्षक उपस्थित होते.

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!