सेलूत “चैत्र पालवी” सुगम संगीताचा कार्यक्रम
संस्कार भारती आणि श्रुती संगीत विद्यालयाच्या वतीने ३१ मार्च रोजी आयोजन
सेलू : संस्कार भारती शाखा सेलू आणि श्रुती संगीत विद्यालय सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, ३१ मार्च रोजी दुपारी पाच वाजता नूतन विद्यालयाच्या रा.ब.गिल्डा सभागृहात हिंदू नववर्षाच्या (गुढीपाडवा) स्वागतासाठी “चैत्र पालवी” सुगम संगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते गोविंद जोशी तर प्रमुख पाहुणे म्हणून राम रोडगे असणार आहेत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्रुती संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे सामूहिक वादन व गायन सादरीकरण होईल. तद्नंतर स्वरांजली ग्रुपच्या कलाकारांची अवीट गोडीची भावगीते, भक्तीगीतांची “चैत्र पालवी” सुगम संगीताची मैफिल बहरणार आहे.
यामध्ये डॉ.राजेंद्र मुळावेकर, डॉ.विलास मोरे, संजय मंडलिक, उल्हास पांडे, दीपक देवा, अनघा पांडे, मनिषा पांडे, सायली दिग्रसकर, सीमा सुक्ते, सुषमा दामा, वैष्णवी मुळे, प्रीती सराफ, पाहुणी कलाकार ईश्वरी निर्मल हे कलाकार सहभागी असणार आहेत. या कार्यक्रमाचे संयोजन रवी कुलकर्णी व रवी मुळावेकर करणार आहेत. दरम्यान, संगीत परीक्षा उत्तीर्ण झालेल्या श्रुती संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मेडल व प्रमाणपत्र वितरण करण्यात येणार आहे. रसिक श्रोत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्कार भारतीचे तालुकाध्यक्ष गंगाधर कान्हेकर यांनी केले आहे.