सूक्ष्म निरीक्षणाची सवय लावा : डॉ.रामेश्वर नाईक

सूक्ष्म निरीक्षणाची सवय लावा : डॉ.रामेश्वर नाईक

सेलूत “अवकाशाचे अंतरंग व ग्रहताऱ्यांशी मैत्री” कार्यक्रमाला प्रतिसाद

सूक्ष्म निरीक्षणाची सवय लावा : डॉ.रामेश्वर नाईक

सकाश न्यूज नेटवर्क, सेलू : सेलू येथे कै.सौ.मेघा अनिरुद्ध पिंपळगावकर यांच्या स्मरणार्थ, परभणी ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी, आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुल परभणी व नूतन विद्यालय सेलू च्या सहकार्याने ” अवकाशाचे अंतरंग व ग्रहताऱ्यांशी मैत्री” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात परभणी ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे अध्यक्ष व प्रसिद्ध डॉ.रामेश्वर नाईक यांनी अवकाश, ग्रहताऱ्यांची व नक्षत्रांची माहीती दिली. या वेळी त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना व श्रोत्यांना सूक्ष्म निरीक्षण करण्याचा सल्ला दिला व त्यांचे फायदे सांगितले.

व्यासपीठावर डॉ. सुबोध माकोडे, संतोष पाटील व मान्यवर उपस्थित होते. परभणी ऑस्ट्रोनॉमिकल सोसायटीचे डॉ. पी.आर.पाटील, सुधीर सोनुनकर, ⁠प्रसाद वाघमारे, अशोक लाड, ⁠डॉ.रविंद्र शिंदे, डॉ. विजयकिरण नरवाडे यांनी विद्यार्थ्यांना टेलीस्कोपच्या साह्याने ग्रहताऱ्यांचे दर्शन व माहिती दिली. प्रास्ताविक संतोष पाटील यांनी केले. सूत्रसंचालन वैष्णवी पिंपळगावकरने केले तर आभार प्रा.डॉ.अमित कुलकर्णी यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा.संजय पिंपळगावकर, प्रा.श्रीकांत देशमुख, किरण देशपांडे, रामपुरकर, प्रा.ढेकळे, राजेंद्र रोडगे, प्रविण लोया, श्रीनिवास पिंपळगावकर, मंदार पाटील, शिवाजी सोळंके व अनिरुद्ध पिंपळगावकर यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाला शहरातील प्रतिष्ठित नागरिक, महिला व विद्यार्थी मोठे संख्येने उपस्थित होते.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!