ऑगस्टपर्यंतचे धान्य जून अखेर मिळणार

ऑगस्टपर्यंतचे धान्य जून अखेर मिळणार

परभणी : आगामी पावसाळा आणि परिणामी पूर इत्यादी प्रतिकूल हवामान परिस्थितीमुळे राष्ट्रीय अन्नरक्षा योजेनेअंतर्गत प्राधान्य कुटुंब अन्न योजना व अंत्योदय अन्न योजनेच्या लाभार्थ्यांना माहे जून ते ऑगस्ट-2025 पर्यंत एकत्रित धान्याची उचल करून लाभार्थ्यांना माहे जून, 2025 अखेर तीन महिन्यांचे एकत्रित धान्य वितरीत करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

निर्णयानुसार परभणी जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजेनेअंतर्गत प्राधान्य कुटुंब अन्न योजनेच्या शिधापत्रिकांची संख्या 2,44,591 व लाभार्थी संख्या 10,86,096 आणि अंत्योदय शिधापत्रिकांची संख्या 44,796 व लाभार्थी संख्या 1,96,997 एवढी आहे. प्राधान्य कुटूंब अन्न योजनेतील लाभार्थ्यांना प्रति सदस्य 2 किलो गहू व 3 किलो तांदूळ व अंत्योदय अन्न योजनेतील लाभार्थ्यांना प्रति शिधापत्रिका गहू 16 किलो व तांदूळ 19 किलो याप्रमाणे माहे ऑगस्टपर्यंतचे तीन महिन्याचे एकत्रित धान्य माहे जून, 2025 अखेरपर्यंत रास्तभाव दुकानातून वितरीत होणार आहे.

पात्र लाभार्थींनी माहे जून ते ऑगस्ट या तीन महिन्याचे एकत्रित धान्याची उचल रास्तभाव दुकानात ई-पॉस मशीनवर आधार अधिप्रमाणीत करून घ्यावयाची आहे. लाभार्थ्यांनी ई-पॉस मशीनवर आधार अधिप्रमाणीत केल्यानंतर मशीनमधून संबंधित लाभार्थ्यांस तीन महिन्यांचे अनुज्ञेय असलेल्या धान्याचे पावतीप्रमाणे धान्य स्विकारण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी विलास मुसळे यांनी केले आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!