SSC Exam 2025 : नूतन विद्यालयाच्या स्वरा लाठकरला १०० टक्के गुण

SSC Exam 2025 : नूतन विद्यालयाच्या स्वरा लाठकरला १०० टक्के गुण

गुणपडताळणीमध्ये तब्बल १४ गुणांची वाढ 

सेलू : मार्च २०२५ च्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत सेलू येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या नूतन विद्यालयातील स्वरा रविंद्र लाठकर या विद्यार्थिनीच्या गुणांत गुणपडताळणीत एकूण १४ गुणांची वाढ झाली आहे. सुधारित गुणांसह बेस्ट ऑफ फाईव्हमध्ये तिने एकूण ५०० (१०० टक्के) गुण मिळविले आहेत. याआधी शाळेच्या स्वराज लक्ष्मण जाधव याने १०० टक्के गुण मिळविले आहेत. आता स्वरा लाठकर हीने १०० टक्के गुण मिळवून नूतन विद्यालयाच्या नावलौकिकात भर घातली आहे. शाळेच्या वतीने मुख्याध्यापक संतोष पाटील यांनी शुक्रवारी, १३ जून रोजी स्वराचे कौतुक केले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया, उपाध्यक्ष डी.के.देशपांडे, सचिव प्राचार्य डॉ.व्ही.के.कोठेकर, सहसचिव जयप्रकाशजी बिहाणी, प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी,  कार्यकारी मंडळ पदाधिकारी, सदस्य, शिक्षक व कर्मचारी यांच्यासह विविध स्तरांतून स्वराचे अभिनंदन होत आहे.

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!