प्रशिक्षणातील अन्यायाविरोधात शिक्षक सेनेचा धडक मोर्चा
ऑनलाईन प्रशिक्षणाची मागणी
पुणे : शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणित महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेने वरिष्ठ वेतनश्रेणी आणि निवडश्रेणी प्रशिक्षणात शिक्षकांवर झालेल्या अन्यायाविरोधात आणि आक्षेपार्ह बाबींवर योग्य न्याय मागण्यासाठी अलका टॉकीज चौक ते विद्या परिषद कार्यालयापर्यंत शुक्रवारी, १३ जूनरोजी राज्यस्तरीय धडक मोर्चा काढण्यात आला.
काही मिनिटांच्या अनुपस्थितीमुळे प्रशिक्षणास मुकाव्या लागणाऱ्या शिक्षकांसाठी तत्काळ ऑनलाइन प्रशिक्षणाची व्यवस्था करावी, नजीकच्या काळात सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांचे प्रशिक्षण त्यांच्या सेवानिवृत्ती दिनांकापूर्वी आयोजित केले जात नसल्यास त्यांनी पूर्ण केलेल्या प्रशिक्षण कालावधीच्या आधारे त्यांना Deemed Completed समजून प्रमाणपत्र द्यावे, या आणि इतर मागण्यांची कार्यवाही न झाल्यास राज्य शिक्षक सेनेला तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी पुणे जिल्ह्यातील शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने एस.सी.ई.आर.टी.चे संचालक राहुल रेखावार यांची भेट घेऊन शिक्षक आमदार ज. मो. अभ्यंकर यांनी मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुनील जगताप, संजय नायडू, नारायण शिंदे, ज्ञानेश्वर गायकवाड, सचिव जितेंद्र पायगुडे, रणजित बोत्रे, सुदाम करंजावणे, रूपाली आव्हाड, उमाकांत शेळके, विवेक शिंदे, मल्हार कुंजीर, अतुल शेलार, गीतांजली कांबळे, जयश्री कासार, हनुमंत चव्हाण, कविता राणे-पाटील, वाघमारे, गणेश शिंदे पालवे, सराटे सर, बीड जिल्ह्यातील शिक्षक सुनील कुलकर्णी, सुधाकर सानप, कृष्णा जाधव, सपना अग्रवाल, योगिता बलाक्षे, वैशाली शेवाळे, नामदेव गवळी, भावना चव्हाण, रोहिणी शेलार, मंजू मते, रूपाली खेडेकर, स्वाती अमृळे उपस्थित होते.