आपत्ती व्यवस्थापन : शालेयस्तरावर स्वबचावाचे धडे दण्याची गरज : प्रताप काळे
बाल विद्यामंदिर हायस्कूलमध्ये आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबीर, अप्पर जिल्हाधिकारी प्रताप काळे यांनी केले मार्गदर्शन
परभणी : बाल विद्यामंदिर हायस्कूल येथे जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले. या वेळी अप्पर जिल्हाधिकारी प्रताप काळे यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, “ बोलताना आज समाजात अपघाताचे प्रमाण वाढताना दिसत आहेत. नैसर्गिक आपत्ती केंव्हाही येऊ शकते. त्याचा सामना करण्यासाठी प्रत्येकाने सजग व जागृत राहिले पाहिजे. त्यासाठी शालेयस्तरावर विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकातून प्रशिक्षण देऊन त्यांचा स्वबचाव व इतरांना संकट काळात मदत कशी करावी याचे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे.” अध्यक्षस्थानी प्रशालेच्या मुख्याध्यापिका शामा मुधळवाडकर, प्रमुख पाहुणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी पवन खांडके, मुख्यप्रशिक्षक (यशदा) योगेश्वर आव्हाळे, अग्निशामक दलाचे दिपक कानोडे, पर्यवेक्षक आर.जी.तुम्मेवार, बी.के.कोपरटकर आदी उपस्थित होते. प्रताप काळे म्हणाले की, “प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांसाठी आपत्ती व्यवस्थान विभाग कार्यक्षम पध्दतीने कार्यान्वित होणे आवश्यक आहे. त्यातून विद्यार्थी निर्भीड बनून आपत्ती काळात ते स्वतःसह इतरांचा बचाव करू शकतील. त्यासाठी सर्वप्रथम शिक्षकांनी आपत्ती व्यवस्थापनातील उत्तम प्रशिक्षिक झाले पाहिजे.” मुख्यप्रशिक्षक योगेश्वर आव्हाळे यांनी विद्यार्थ्यांसमोर विविध प्रात्यक्षिके सादर केले. विद्यार्थ्यांना त्यात सहभागी करून घेतले. मुख्याध्यापिका शामा मुधळवाडकर यांनी प्रशालेतील आपत्ती व्यवस्थापन विभागाचा अहवाल मान्यवरांसमोर मांडला. सूत्रसंचालन सुभाष ढगे, तर आभार आपत्ती व्यवस्थापक विभागाचे विभागप्रमुख संभाजी मोरे यांनी मानले.