विभागीय कथाकथन : स्पर्धेची फेरी आजपासून ; ३०० बालकथाकारांचा सहभाग

विभागीय कथाकथन : स्पर्धेची फेरी आजपासून ; ३०० बालकथाकारांचा सहभाग

सानेगुरुजी जयंती निमित्त हेलस कथामाला व मानस फाऊंडेशन जालना यांचा संयुक्त उपक्रम

परभणी/जालना : अखिल भारतीय सानेगुरुजी कथामाला शाखा हेलस आणि मानस फाउंडेशन जालना यांच्यातर्फे विभागीय कथाकथन स्पर्धेची जिल्हाफेरी बुधवारी २८ डिसेंबर रोजी नियोजित केंद्रांवर होत आहे. मराठवाड्यातील विविध जिल्ह्यातील ३०० बालकथाकारांचा सहभाग यात राहणार आहे
जिल्हा फेरीतील प्रथम विजेत्या स्पर्धकांची मराठवाडा विभागीयस्तरावर सात जानेवारीला स्पर्धा होणार आहे. स्पर्धा निःशुल्क आहे. स्पर्धेसाठी प्रवेश खुला असून स्पर्धेचे हे चौथे वर्ष आहे, अशी माहिती संयोजक कल्पना हेलसकर, डॉ. सुहास सदाव्रते, डॉ. प्रकाश आंबेकर, जमीर शेख, बाबासाहेब हेलसकर, विजय वायाळ, सतीश कुलकर्णी, प्रमोद कुलकर्णी, मंताजी ढाकरे यांनी दिली.

स्व. दत्तात्रय हेलसकर यांनी १९९४ मध्ये स्थापन केलेल्या कथामालेच्या विद्यार्थ्यांसाठी संस्कारक्षम शैक्षणिक, सामाजिक, विधायक उपक्रम राबविले जातात. सुप्त कलागुणांना प्रोत्साहित करण्यासाठी पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी दोन गटात कथाकथन देण्यात येईल. स्पर्धा प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आहे. बालगट इयत्ता पाचवी ते सातवी व किशोर गट इयत्ता आठवी ते दहावी कथाकथनासाठी मराठीतील संस्कारक्षम, बोधप्रद कथेची निवड करणे आवश्यक आहे. कथा पाच ते सात मिनिटांची असावी. जिल्हास्तरीय विजेत्यांना प्रथम, द्वितीय व तृतीय पारितोषिक प्रमाणपत्र व ‘श्यामची आई’ ग्रंथ भेट देण्यात येईल. जिल्हास्तरीय पहिल्या क्रमांकाच्या स्पर्धकांची विभागीय स्पर्धेसाठी निवड करण्यात येईल. विभागीय फेरी सात जानेवारी रोजी आहे. विभागस्तरीय विजेत्यांना रोख पारितोषिके, प्रमाणपत्र प्रथम पारितोषिक दीड हजार रुपये, द्वितीय : एक हजार रुपये, तृतीय : पाचशे रुपये व उत्तेजनार्थ पारितोषिक आहे. सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र अधिक माहितीसाठी जिल्हा संयोजक जालना : आर. आर. जोशी, पवन कुलकर्णी. परभणी : डॉ. काशिनाथ पल्लेवाड, कीर्ती राऊत. औरंगाबाद : सुनील साबळे, योगिता देवगिरीकर. नांदेड : डॉ. व्यंकटेश चौधरी, विलास कोळनूरकर. लातूर : राम तत्तापुरे, संजीवकुमार दवनाळे. बीड : वाय. जी. बेंबडे, हरिश अरसूल. हिंगोली : संगीता देशमुख, सुवर्णा जाधव. उस्मानाबाद : कुंडलिक पवार, ए. एस. कुरूलकर.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!