बाळासाहेबांची शिवसेना : जिंतूर -सेलू तालुक्यातील ४२ सरपंच शिंदे गटात
अक्षता चक्कर यांचा दावा, मुंबईत झाला प्रवेश
जिंतूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटात वर्चस्वाची लढाई सुरू आहे. ही लढाई आता परभणी पर्यंत येऊन ठेपली आहे. परभणी जिल्ह्यातील तब्बल ८४ सरपंचांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. यामध्ये जिंतूर-सेलू मतदारसंघातील ४२ सरपंचासह अनेक कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
शिंदे गटाचे कळमनुरीचे आमदार संतोष बांगर; तसेच परभणीचे बाळासाहेबांची शिवसेना जिल्हाप्रमुख व्यंकटराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि जिंतूर येथील शिंदे गटाच्या नेत्या अक्षता राजेश चक्कर पाटील यांच्या पुढाकारातून जिंतूर सेलू मतदारसंघातील ४२ गावच्या सरपंचासह कार्यकर्त्यांचा मुंबई येथे जाऊन पक्ष प्रवेश केला असल्याचा दावा अक्षता चक्कर यांनी केला आहे.