Drawing Grade Exam : सेलूतील ४१२ विद्यार्थ्यांनी दिली चित्रकला ग्रेड परीक्षा
प्राचार्य डॉ.व्ही.के.कोठेकर यांनी दिली केंद्राला भेट
सेलू जि.परभणी : सेलू येथील नूतन विद्यालय परीक्षा केंद्रावर आयोजित एलिमेंटरी व इंटरमिजिएट शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षेत सेलू् शहर व तालुक्यातील ४१२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आहे. एलिमेंटरी ग्रेडसाठी २१२, तर इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेत २०० विद्यार्थी सहभागी झाले. शनिवारी, सात ऑक्टोबरोजी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ.व्ही.के.कोठेकर यांनी परीक्षा केंद्रावर भेट दिली. मुख्याध्यापक एन.वाय.सोळंके, उपमुख्याध्यापक संतोष पाटील, पर्यवेक्षक डी.डी.सोन्नेकर, के.के. देशपांडे, चित्रकला विभाग प्रमुख आर.डी.कटारे आदींची उपस्थिती होती. परीक्षेसाठी कला शिक्षक फुलसिंग गावित, संतोष राठोड, आबासाहेब बिडवे, आर.बी.चव्हाण, श्रीमती व्ही.व्ही वाघमारे, एम.जे.वाघमारे, संदीप जुमडे, सुरेखा आहेरकर, अनुसया शिंदे, शीतल अवचार आदींसह शिक्षक व कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.