महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ : सेलू तालुका अध्यक्षपदी रामकिशन कटारे; संतोष ताल्डे सचिव
सेलू : महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळाच्या सेलू् तालुकाध्यक्षपदी नूतन विद्यालयाचे कलाशिक्षक रामकिशन कटारे यांची, तर सचिव म्हणून आहेर बोरगावच्या नितीन माध्यमिक विद्यालयातील कलाशिक्षक संतोष ताल्डे यांची निवड करण्यात आली आहे. नूतन कार्यकारणी ज्येष्ठ कलाशिक्षक बी एस केदारी यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आली. कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्ष : येथील कलाशिक्षक सुनील मोरे (न्यू हायस्कूल सेलू), कोषाध्यक्ष : फुलसिंग गावित, कार्याध्यक्ष : रोहिदास चव्हाण, प्रसिद्धीप्रमुख पांडुरंग पाटणकर, कार्यवाहक अरविंद वाटुरे सहसचिव महादेव बोरकर, तर सदस्य सच्चिदानंद डाखोरे, सुनील मुसळे, उमाकांत बरकुले, अनिकेत चिटणीस यांचा समावेश आहे. या वेळी नवनिर्वाचित पदाधिकार्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी जेष्ठ कलाशिक्षक केदारी यांनी पालघर येथे होऊ घातलेल्या राज्य कला शिक्षण परिषदेसाठी जास्तीत जास्त कला शिक्षकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.