अपूर्वा पॉलिटेक्निक कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

अपूर्वा पॉलिटेक्निक कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

सेलू : महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या हिवाळी परीक्षा 2023 चा निकाल नुकताच जाहीर झाला असून यात अपूर्वा पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.शेख झाहेद युनूस या विद्यार्थ्याने 86.50% गुण मिळवून महाविद्यालयातून प्रथम क्रमांक मिळविला. तर गणगे गोकर्णा दत्तात्रय 83.68% व चाळक अश्विनी राजेभाऊ 81.68% गुण मिळवून अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला.त्यांच्या या यशाबद्दल श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे संस्थेच्या सचिव डॉ.सविताताई रोडगे,प्रशासकीय अधिकारी प्रा. महादेव साबळे प्राचार्य प्रा.अशोक बोडखे, उपप्राचार्य प्रा. गजानन जाधव, विभाग प्रमुख वाघ श्याम,प्रा. संतोष करांडे व सर्व शिक्षक वृंदांनी अभिनंदन केले. गंधाला पुष्पांजली 80.82%, लक्षरी फयाज 80.20%,पारधी महेश 80.00%, भारती विवेक 79.88%, मगर सोनी 79.65%, साखरे कीर्ती 77.65%, कातारे वैष्णवी 77.53%, ठोंबरे प्रतीक्षा 73.40%, शेख आयान 73.29%, माने गोविंद 73.06%, कांबळे सूनाक्षी 72.71%, जाधव अजय 71.65%, आर्दड श्रेयश 71.13%, शेख मुस्तफिज 70.30% इत्यादी विद्यार्थी विशेष प्रविण्यासह उत्तीर्ण झाले

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!