संत रविदास महाराज जयंती उत्साहात; सेलूमध्ये कार्यक्रम
सेलू जि.परभणी : संत शिरोमणी गुरू रविदास महाराज यांची ६४७ वी जयंती विविध संस्थांच्या वतीने शनिवारी, २४ फेब्रुवारी रोजी उत्साहात साजरी करण्यात आली. सेलू्तील सर्वोदयनगर येथील संत रविदास महाराज समाज मंदिरात सकाळी अभिवादन कार्यक्रम झाला. या वेळी माजी आमदार विजय भांबळे, माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, रघुनाथ बागल, सुधाकर रोकडे, भारत काठोटे, दशरथ पानझाडे,विशाल देशमुख, कल्याण जोगदंड. सचिन शिंदे, पंकज चव्हाण, गणेश पाहारे, गणेश भगुरे, सुभाष फुलमाळी, दशरथ पानझाडे, सतीश शिंदे, पुरण पुर्भे, दीपक बच्छिरे, अमोल हाळणे, वैजीनाथ पानझाडे. महादेव देवलाल, अनिल सरकटे. काठोटे, पानझाडे, गोकुळ तरटे, संतोष काठोटे, रमेश श्रीपाद, वैभव श्रीपाद, अनिल सरकटे आदींंसह चर्मकार समाज बांधवांची मोठी उपस्थिती होती. आहेर बोरगावच्या नितीन विद्यालय पांडुरंग लाडाने, आबासाहेब बिडवे, भगवान पवार, शिवाजी काळेे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. जिल्हा नियोजन अधिकारी किशोरसिंह परदेशी यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.