आहेर बोरगावच्या नितीन विद्यालयात संत रोहिदास महाराज यांना अभिवादन 

आहेर बोरगावच्या नितीन विद्यालयात संत रोहिदास महाराज यांना अभिवादन 

 

सेलू : तालुक्यातील आहेर बोरगाव नितीन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे संत रोहिदास महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमुख्याध्यापक पांडुरंग लाडाणे होते. लाडाणे यांच्या हस्ते प्रथम पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. कार्यक्रमासाठी पाहुणे म्हणून आबासाहेब बिडवे, भगवान पवार होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुरेंद्र दिसेगत , गंगाधर आवचार, राजाभाऊ चव्हाण, कैलास चोकोनफळे, कैलास पुंगळे, ज्ञानेश्वर सोळंके, हनुमान वाघ, चैतन्य खरात उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विष्णू आंधळे यांनी केले, तर कार्यक्रमाचे आभार राष्ट्रीय चर्मकार सेलू तालुका उपाध्यक्ष शिवाजी काळेे यांनी मानले. कार्यक्रमासाठी विद्यार्थी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!