मराठा आरक्षणासाठी ‘रास्ता रोको’; चिकलठाणा फाट्यावर चक्का जाम
सेलू जि.परभणी : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत परभणी जिल्ह्यात ठिकठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीने शनिवारी, २४ फेब्रुवारी रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
सेलू तालुक्यातीलसकल मराठा समाजाच्या वतीने ५४८ (ब) राष्ट्रीय महामार्गावर चिकलठाणा फाटा (ता.सेलू्) येथे शनिवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.यामुळे जागोजागी वाहतूक ठप्प झाली होती. ‘एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणा देत मराठी समाज बांधवांनी आंदोलनात सहभाग घेतला. परभणी, सेलू, जिंतूर, पूर्णा, गंगाखेड, मानवत, पाथरीसह अन्य तालुक्यातील ग्रामीण भागात रास्ता रोकोमुळे वाहतूक विस्कळित झाली होती. मराठा आरक्षणात सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी, आरक्षण ओबीसी मधून द्यावे, अशी मागणी या वेळी करण्यात आली.