राधे धामणगावच्या शाळेत दप्तराविना शाळा; विविध कलाकृती करण्यात विद्यार्थी दंग

राधे धामणगावच्या शाळेत दप्तराविना शाळा; विविध कलाकृती करण्यात विद्यार्थी दंग

 

एचएआरसी संस्थेचा उपक्रम

 

सेलू जि.परभणी : संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून परभणी येथील होमिओपॅथीक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज या संस्थेच्यावतीने बालकांचे मोबाईल व्यसन दूर व्हावे व बालकांमध्ये वाचन संस्कृती रुजावी आणि बालकांचा कला विकास मनोरंजक पद्धतीने व्हावा या उद्देशाने शनिवारी २४ फेब्रुवारी रोजी कला कार्यशाळा आयोजिण्यात आली होती. विविध कलाकृती करण्यात विद्यार्थी दंग झाले होते.

या वेळी मुख्याध्यापक राजू दयावरवार, तानाजीराजे भोसले, अमोल श्रीखंडे, शकुंतला बरसाले व कार्यशाळेचे मुख्यप्रवर्तक पांडुरंग पाटणकर उपस्थित होते.कार्यशाळेचे उद्घाटन राजू दयावरवार यांनी केले. पांडुरंग पाटणकर यांनी सकाळसत्रात चित्र, शिल्प ,नृत्य नाट्य, गायन आणि वादन आदी ललित कला विषयी मार्गदर्शन केले. कागदकाम, टाळ्यांचे प्रकार, विविध माध्यम प्रिंट , कोलाज चित्र आणि सुतळी काम या विषयी मार्गदर्शन केले. द्वितीय सत्रात कृतियुक्त गाणे आणि शेकोटी कार्यक्रमात बालकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. ९० मुलांनी कृतीशील सहभाग नोंदविला. सूत्रसंचालन तानाजीराजे भोसले यांनी केले. अमोल श्रीखंडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शकुंतला बरसाले, सत्यभामा गोरे यांनी सहकार्य केले. तसेच सदरील कार्यक्रमासाठी एचएआरसी संस्थेचे डॉ. पवन चांडक आणि प्राध्यापक शिवा आयथॉल यांचे सहकार्य लाभले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!