सेलूतील नूतन कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिकापदी उज्ज्वला लड्डा

सेलूतील नूतन कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिकापदी उज्ज्वला लड्डा

सेलूतील नूतन कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिकापदी उज्ज्वला लड्डा

सेलू जि.परभणी : येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्था संचालित श्रीमती लक्ष्मीबाई लालजी रामजी नूतन कन्या प्रशाला व श्रीमती तेजीबाई कन्हैयालाल अग्रवाल नूतन कन्या उच्च माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिकापदी जेष्ठ महिला शिक्षिका उज्ज्वला भगीरथ लड्डा-भाला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या संदर्भातील पत्र संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर यांनी दिले आहे. उज्ज्वला लड्डा ह्या संस्थेच्या नूतन विद्यालयात जेष्ठ महिला शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. संस्थेच्या वतीने पदोन्नतीने लड्डा यांची नूतन कन्या प्रशालेमध्ये मुख्याध्यापक पदी सेवाबदली केली. लड्डा यांनी मुख्याध्यापिका पदाचा पदभार स्वीकारला. या वेळी लड्डा यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर, उपमुख्याध्यापक डी.बी.घोगरे, पर्यवेक्षक आर.एस.मोगल, सतीश कुंडीकर, सुहास देऊळगावकर, भालचंद्र गांजापुरकर, शशिकांत देशपांडे, गणेश माळवे, अनंत बोराडे, रेणुका अंबेकर, श्रीमती खडके, सौ.आगळे, बालाजी देऊळगावकर यांची उपस्थिती होती. लड्डा यांच्या नियुक्तीबद्दल विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!