प्रॉस्परस पब्लिक, रोडगे इंग्लिश स्कूलमध्ये ‘मराठी भाषा दिन‘ जल्लोषात
सेलू : श्रीराम प्रतिष्ठान संचालित प्रॉस्परस पब्लिक स्कूलमध्ये मराठी दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री डॉ.संजय रोडगे, सचिव डॉ.सौ.सविता रोडगे,शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.प्रगती क्षीरसागर व सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते .
मराठी राजभाषा दिवस हा दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या वाढदिवसादिवशी साजरा करण्यात येतो. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्रच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले गेले आहेत.
या कार्यक्रमा अंतर्गत शाळेत निबंध स्पर्धा, कथाकथन,भाषण, स्पर्धा, शब्दकला,काव्यगायन,समूहगीत, नृत्य,मराठी भोजनाचा आस्वाद इत्यादी घटकांचा समावेश होता. याप्रसंगी डॉ. रोडगे यांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषेचे महत्त्व समजावत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयुष पवार याने व आभार प्रदर्शन अभिषेक बागल याने केले.
♦एल.के.आर.आर.मध्ये जल्लोष
श्रीराम प्रतिष्ठान संचालित एल.के.आर.आर स्कूलमध्ये मराठी दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री डॉ.संजय रोडगे, सचिव डॉ.सौ.सविता रोडगे,शाळेचे मुख्याध्यापक श्री.कार्तिक रत्नाला ,सौ.प्रगती क्षीरसागर व सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते .
मराठी राजभाषा दिवस हा दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या वाढदिवसादिवशी साजरा करण्यात येतो. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्रच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले गेले आहेत.
या कार्यक्रमा अंतर्गत शाळेत निबंध स्पर्धा,पोवाडा,भाषण, स्वरचित कविता,काव्यगायन, लेझीम नृत्य इत्यादी घटकांचा समावेश होता.
याप्रसंगी डॉ. रोडगे यांनी प्रत्यक्षात भेट दिलेल्या पावनखिंड व संगमेश्वर या ठिकाणाबद्दल तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याबद्दल आणि विद्यार्थ्यांना मराठी भाषेचे महत्त्व समजावत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मैथिली मोरे हिने व आभार प्रदर्शन स्नेहा कव्हळे या विद्यार्थिनीने केले.