सेलूतील यामीनखानने तेराव्या वर्षी केेले कुराण पठण पूर्ण
सेलू जि.परभणी : येथील गुलमोहर कॉलनीमधील यामीनखान निसार अहमद पठाण याने वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी कुराणाचे पठण पूर्ण केले. मौलाना वहाब सहाब नदवी यांच्या मार्गदर्शनाखाली यामीनखानने कुराणाचे पठण पूर्ण केले. याबद्द्ल हाजी रौफ साहब, हाजी निसार.खान, मोबीन खान, आमान खान, छोटे खान अन्वर अली खान, शेख मोहसीन, अझहर पठाण, मिर्झा झहीर बेग, याकुब खान, शेख जहीर, इरफान जमीनदार यांनी अभिनंदन केले.