नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घेतले पर्यावरण, राष्ट्रसेवेचे धडे; पाच दिवसीय शैक्षणिक सहल उत्साहत

नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घेतले पर्यावरण, राष्ट्रसेवेचे धडे; पाच दिवसीय शैक्षणिक सहल उत्साहत

नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घेतले पर्यावरण, राष्ट्रसेवेचे धडे; पाच दिवसीय शैक्षणिक सहल उत्साहत

सेलू जि.परभणी : भारतीय स्वातंत्र्य चळवळीची पार्श्वभूमी असलेल्या नूतन विद्यालय शिक्षण संस्था संचालित नूतन विद्यालय सेलूच्या विद्यार्थ्यांनी दिनांक २५ फेब्रुवारी रोजी खडकवासला पुणे येथील नॅशनल डिफेन्स अकॅडमीला सहलीद्वारे भेट दिली. या भेटीमध्ये विद्यार्थ्यांना देशाच्या तिन्ही सेनादलाबद्दल माहिती मिळाली. यामध्ये भारतीय वायुसेना, भारतीय नौसेना आणि भारतीय लष्कर यांचा समावेश आहे. याशिवाय विद्यार्थ्यांनी भारताचे इतर मित्र देशांशी असलेले संबंधांबद्दल देखील माहिती घेतली.
देशसेवा करण्यासाठी या तिन्ही सेनादलामध्ये प्रवेश मिळण्यासाठी असलेली परीक्षा, त्यासाठी असलेली स्पर्धा, त्या स्पर्धेची तयारी अशा विविध बाबी उत्सुकतेने जाणून घेतल्या. याशिवाय विमान उडवण्याची कला देखील विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभवली. एनडीएमध्ये असलेली कॅडेट मेस ही जगातील तिसऱ्या क्रमांकाची आणि आशिया खंडातील प्रथम क्रमांकाची मेस असून या ठिकाणी तिन्ही सेनादलातील जवळपास 2200 ऑफिसर्स एकत्रितपणे एकाच वेळी जेवण करतात हे पाहून विद्यार्थी आश्चर्यचकित झाले. एनडीए भेटीच्या आयोजनात डॉ. संतोष मलसटवाड यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. याशिवाय ही सहल महाबळेश्वर रायगड प्रतापगड जंजिरा काशीद बीच आणि पाली उन्हेर कुंड अशा ठिकाणी भेट दिली. श्री कपाटे  श्री विश्वंभर  श्री कटारे  श्री आंबेकर  श्री पांडे  श्री तोरणाळे  श्री मुळी  श्री धापसे सौ. कदम मॅडम सौ. कुलकर्णी  यांच्या पुढाकाराने सहल यशस्वीपणे पार पडली. उपक्रमाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. सत्यनारायणजी लोया, संस्थेचे सचिव डॉ. विनायकराव कोठेकर,सहसचिव श्री जयप्रकाशजी बिहाणी यांनी सर्वांचे कौतुक केले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!