सेलूतील संत गोविंद बाबा दादू पंथी मठ गौशाळेला २० लाखांचा निधी; राज्य गोसेवा आयोगचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी केली गोशाळेची पाहाणी
सेलू : शहरातील श्री संत गोविंद बाबा दादू पंथी मठ गौशाळा येथे राज्यमंत्री व महाराष्ट्र गोसेवा आयोगचे अध्यक्ष शेखरजी मुंदडा यांनी गोशाळेत भेट दिली. शासनाच्या वतीने गोशाळेस २० लक्ष रुपये मंजूर करून दिले. गोशाळेच्या बऱ्याच अडचणी मुंदडा यांना सांगण्यात आल्या त्यावर तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले. भारतीय जनता पार्टी शहराच्या वतीने.शेखरजी मुंदडा यांचे स्वागत करण्यात केले. कार्यक्रमास उद्योग समूहाचे नंदकिशोर बाहेती, विजयकुमार बिहाणी , सुरेंद्र तोष्णीवाल, संदीपभाई शर्मा महाराज, वल्लभ बाहेती, जगनराव पवार, ॲड. संजय लोया, ॲड खोना, शिवनारायण मालाणी, राजेंद्र करवा, श्रीराम जन्मोत्सव समितीचे कृष्णा काटे, संत गोविंदबाबा दादुपंथी मठ, गोशाळेचे सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते.