नूतन विद्यालयामध्ये मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कार्यक्रम

नूतन विद्यालयामध्ये मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कार्यक्रम

सेलू जि.परभणी : कवी कुसुमाग्रज यांची जयंती मराठी भाषा गौरव दिन मंगळवार ( २७ फेब्रुवारी ) रोजी नूतन विद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी मुख्याध्यापक संतोष पाटील हे होते. व्यासपीठावर पर्यवेक्षक किरण देशपांडे, देविदास सोन्नेकर, अशोक लिंबेकर, शिक्षक प्रतिनिधी परसराम कपाटे यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते नाटककार, कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रभारी मुख्याध्यापक संतोष पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपल्या मनोगतात मराठी भाषेचा उज्वल इतिहास, मराठी साहित्याची समृद्ध लेखन परंपरा सांगितली. सूत्रसंचालन संध्या फुलपगार यांनी केले. तर आभार प्रदर्शन डॉ. काशिनाथ पल्लेवाड यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मराठी विभाग प्रमुख सुरेश हिवाळे, शैलजा कऊटकर, सच्चिदानंद डाखोरे, वर्षा कदम, प्रभू भुसारे यांनी पुढाकार घेतला.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!