अंधश्रद्धा बाळगू नका : केंद्रप्रमुख एकनाथ जाधव; कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन
सेलू जि.परभणी : कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयराष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी मार्गदर्शन करतांना केंद्रप्रमुख एकनाथ जाधव सांगितले की; लहानपणापासून आपण वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगला पाहिजे. एखाद्या गोष्टीकडे सूक्ष्म निरीक्षणांनी पाहिले पाहिजे. तुम्हाला पुढे जायचे असेल तर अभ्यासाशिवाय पर्याय नाही. प्रत्येक महान व्यक्तींनी आपले ध्येय डोळ्यासमोर ठेवून प्रमाणिक प्रयत्न केलेले आहेत. त्यामुळे जो प्रामाणिक प्रयत्न करतो तो नक्की यशस्वी होतो. श्रद्धा ठेवावी पण अंधश्रद्धा बाळगू नये. यावेळी व्यासपीठावर मुख्याध्यापिका एस.एस.वेडे गृहप्रमुख प्रेरणा पवार, विज्ञान शिक्षिका आश्विनी बोराडे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रस्ताविक विज्ञान शिक्षिका अश्विनी बोराडे यांनी केले. मुख्याध्यापिका सुनीता वेडे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील विद्यार्थिनींनी विविध वैज्ञानिक रांगोळी रेखाटल्या होत्या. शाळेच्या आवारात विविध प्रयोगांचे सादरीकरण बालिकांनी केले. सूत्रसंचालन पांडुरंग पाटणकर यांनी केले तर आभार श्रीमती सुनीता वेडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुहास नवले, सहशिक्षिका वनदेवी वाघमारे ,योजना कातकडे, अनुसया शिंदे , शीतल अवचार , रावसाहेब पदमपल्ले आदींनी पुढाकार घेतला.